#Datta Datta #दत्त दत्त #श्रीदत्त श्रीदत्त #ShriDatta ShriDatta #mahalaya mahalaya #महालय महालय #pitrupaksha pitrupaksha #पितृपक्ष पितृपक्ष #shraddha shraddha #श्राद्ध श्राद्ध #ShraddhaRituals Shraddha rituals #श्राद्धविधी श्राद्धविधी #Shraddhavidhi Shraddha vidhi
माता-पित्यांचा मृत्यू झाल्यावरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते. त्या कर्तव्यपूर्तीची आणि पितृऋण फेडण्याची सुसंधी श्राद्धकर्मामुळे मिळते. माता-पित्यांचा मृत्यूत्तर प्रवास सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. आज आपत्कालात श्राद्ध करण्यासंदर्भातील नियम पाहूया.
१. ‘श्राद्धाच्या दिवशी सोयर किंवा सुतक (सुतक म्हणजे अशौच, मृत माणसाबद्दल धरावयाचा विटाळ आणि सुवेर (सोयर) म्हणजे जननाशौच) आल्यास ते संपल्यावर पंचगव्य प्राशन करून अन् जानवे पालटून श्राद्ध करावे किंवा सुवेर वा सुतक संपल्यावर येणाऱ्या अमावास्येस श्राद्ध करावे.
२. श्राद्धाला आरंभ झाल्यानंतर सुवेरसुतक आल्यास, श्राद्ध पुरे होईपर्यंत सुवेरसुतक मानू नये; पण घरातच सुवेरसुतकासारखी घटना घडल्यास श्राद्ध थांबवावे आणि सुवेरसुतक संपल्यावर करावे.
३. प्रत्येक वर्षी करायचे श्राद्ध मलमासात (अधिक मासात) करू नये.
४. पत्नी रजस्वला झाल्यास वार्षिक श्राद्ध त्याच दिवशी अपिंडक करावे किंवा पाचव्या दिवशी करावे. शक्यतो आमश्राद्ध किंवा हिरण्यश्राद्ध करू नये. त्या दिवसांत महालय करू नये. पाचव्या दिवसानंतर कधीही महालय करता येते.
५. श्राद्धकर्ती रजस्वला झाल्यास पाचव्या दिवशी श्राद्ध करावे.
६. श्राद्ध तिथीला एकादशी आल्यास, श्राद्धीय अन्न उजव्या हातात घेऊन त्याचा केवळ वास घ्यावा आणि ते अन्न गायीला घालावे किंवा हिरण्यश्राद्ध करावे.
विशिष्ट क्षेत्री श्राद्ध करण्याचे महत्त्व
१. श्राद्ध करण्यास अधिक योग्य क्षेत्रे आणि त्यांचे महत्त्व !
‘गंगा, सरस्वती, यमुना, पयोष्णी इत्यादी नद्यांच्या ठिकाणी; महोदधी म्हणजे मोठ्या समुद्राच्या काठी; प्रभासतीर्थ, पुष्करतीर्थ, प्रयागराज, काशी (वाराणसी), गया, मातृगया, कुरुक्षेत्र, गंगाद्वार इत्यादी तीर्थांच्या ठिकाणी; नैमिषक्षेत्र, धर्मारण्य, धेनुकारण्य इत्यादी अरण्यांच्या ठिकाणी; ब्रह्मसरोवर, महासरोवर यांच्या ठिकाणी; अक्षय्यवट, महाक्षेत्रे यांच्या ठिकाणी; तुळसी, आवळे यांच्या वनांतील छायेखाली इत्यादी क्षेत्रांत श्राद्धे केली असता अक्षय्य पद प्राप्त होते.
२. श्राद्धाच्या संदर्भात गया क्षेत्राचे महत्त्व !
अ. गया क्षेत्रातील प्रेतशिलेवर पिंडदान केल्यामुळे प्रेतत्व नष्ट होऊन आत्मा पितरलोकात जातो.
आ. गया क्षेत्राच्या ठिकाणी शमीपत्राप्रमाणे पिंड दिल्याने सात गोत्रांचा, म्हणजे एकशे एक कुळांचा उद्धार होतो.
वर दिलेल्या सर्व ठिकाणी श्राद्धाप्रमाणेच स्नान, दान, तप इत्यादी कर्मे केली असता, त्या कर्मांचे अक्षय्य फल मिळते.’
संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन’
(सौजन्य : सनातन संस्था आणि सनातन संस्थेचे संकेत स्थळ sanatan.org)
Sanatan Sanstha presents Shraddha Rituals App !
App is available in – Marathi, Hindi, Kannada, Gujarati, Telugu, Malayalam & English