‘बेस्ट’ बस लवकरच हायड्रोजनवर धावणार !

मुंबई – वायू आणि ध्वनी प्रदूषण अल्प व्हावे यासाठी ‘बेस्ट’च्या प्रशासनाने बस हायड्रोजनवर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात डिझेलवर चालणार्‍या २२२ बसचे हायड्रोजन इंधनावर चालवण्यासाठी रूपांतर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. बस हायड्रोजन इंधनावर चालवल्यास वर्षाला २० कोटी ४० लाख रुपयांची बचत होणार आहे.

हायड्रोजन इंधनावर बस चालवल्यास प्रतिमासाला १ सहस्र २०० लीटर डिझेलची बचत होईल. सध्या बेस्टकडे ३ सहस्र ६०० हून अधिक बस आहेत. या बस डिझेल, सी.एन्.जी., हायब्रीड आणि विद्युत् यांवर धावतात.