|
मथुरा (उत्तरप्रदेश) – मुथरा जिल्ह्यातील महारौली गावामध्ये काही धर्मांध मुसलमानांनी तेजराम नावाच्या एका हिंदु वृद्धाच्या घरामध्ये घुसून त्याला धर्मांतर करण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी मथुरा पोलिसांनी कारवाईचा आदेश दिला आहे. २५ जुलै २०२२ या दिवशी तेजराम यांनी पोलिसांत तक्रार केली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, धर्मांध मुसलमानांनी त्यांना धमकावत सांगितले की, या गावात आम्ही (मुसलमान) ९० टक्के असल्याने इस्लाम स्वीकार अथवा गाव सोडून जा !
६० वर्षीय तेजराम यांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की…
१. साधारण १८ वर्षांपूर्वी त्यांना आणि अन्य काही हिंदूंना गावामध्ये सरकारी प्लॉट मिळाले होते. काही दिवसांपूर्वी गावातील ताहिर, तारिफ, आशी, आमिर, इदरीश, गुन्ना, आमीर, अमसर, बब्बू, शब्बीर आणि सग्गन यांनी त्या भूमीवरील झाडे तोडून टाकली, तसेच त्यांनी गावातीलच गोधरन नावाच्या हिंदूच्या शेतातील सीमा तोडून ती स्वत:च्या शेतामध्ये मिसळली. तेजराम यांनी ही तक्रार पोलीस आणि सरकारी अधिकारी यांच्याकडे केल्याने आरोपी धर्मांध नाराज झाले.
२. तेजराम यांनी तक्रारीत पुढे सांगितले की, २३ जुलैच्या सायंकाळी आशी, तारिफ, आमीर, इदरीश, बब्बू आणि अन्य लोक त्यांच्या घरात घुसले. त्यांनी पोलीस आणि सरकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यावरून तेजराम यांना अपशब्द म्हटले. तेजराम यांनी यास विरोध केल्यावर धर्मांधांनी तेजराम यांना मारहाणही केली.
३. या वेळी धर्मांध तेजराम यांना म्हणाले की, हे गाव आमचे (मुसलमानांचे) आहे. येथे आमच्या पद्धतीने सर्वकाही चालेल. येथे ९० टक्के मुसलमान रहातात. आम्हाला त्रास दिला, तर भूमी आणि प्राण गमावून बसशील. आमचा धर्म स्वीकार अथवा गावातून चालता हो ! असे सांगून धर्मांध त्यांच्या घरातील गोष्टींची तोडफोड करून निघून गेले.
४. तेजराम यांच्यानुसार गावातील अन्य हिंदूंनाही अशाच प्रकारची वागणूक मिळत असते; परंतु धर्मांधांच्या भयाने कुणी पुढे येऊन तक्रार करत नाही. धर्मांधांकडे शस्त्रास्त्रे आहेत, तसेच स्थानिक गुंडांशी त्यांचा संपर्क असतो, तसेच कोसीकलां येथील पोलीस आणि सरकारी अधिकारी हेसुद्धा धर्मांधांच्या दबावाखाली काम करतात. तेजराम यांच्या तक्रारीवरून मथुरा पोलिसांनी स्थानिक पोलिसांना संबंधित घटनेचे अन्वेषण करण्याचे आदेश दिले आहेत.
५. ‘ऑपइंडिया’ या हिंदुत्वनिष्ठ वृत्तसंकेतस्थळाशी बोलतांना तेजराम म्हणाले की, मी तरुण असतांना आमच्या गावात मुसलमानांची संख्या अल्प होती. त्यानंतरच्या वर्षांमध्ये केवळ मुसलमानांची लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली, एवढे की काही हिंदूंना गाव सोडून पलायन करण्यास बाध्य व्हावे लागले. गेल्या २० वर्षांपासून एकही हिंदु हा प्रधान बनू शकलेला नाही. दुसरीकडे मुसलमान प्रधान हे आरोपी धर्मांधांचेच समर्थन करत आले आहेत.
संपादकीय भूमिकाभारतातील विविध राज्यांत लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांसाठी हिंदूंवर अत्याचार होणे, हे भारत इस्लामच्या दिशेने जात असल्याचे द्योतक नव्हे का ? हिंदूंनो, धर्मांध बहुसंख्य झाल्याने काय होऊ शकते, याचे काश्मीर, उत्तरप्रदेशातील कैराना आणि बंगाल राज्य ही जिवंत उदाहरणे आहेत. आता मथुरेतील महारौली गावाचे उदाहरणही समोर आले आहे. यातून आताच सावध व्हा आणि स्वसंरक्षणार्थ हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! उत्तरप्रदेशात प्रखर हिंदुत्वनिष्ठ योगी आदित्यनाथ यांचे शासन असल्याने संबंधित धर्मांध मुसलमानांवर कठोर कारवाई निश्चित होईल, याची हिंदूंना आशा आहे ! |