विषमुक्त अन्नासाठी घरच्या घरी भाजीपाल्याची लागवड करा !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

‘आजकाल शेतीत वापरण्यात येणारी रसायने आणि कीटकनाशके शरिराला एवढी हानीकारक असतात की, ती फवारतांना शेतकर्‍यालाही आपले नाक-तोंड झाकून घ्यावे लागते. ‘शेतीतील ही विषारी रसायने अन्नाच्या माध्यमातून माणसाच्या पोटात जात असल्याने आज मधुमेह, रक्तदाब, कर्करोग यांसारखे गंभीर विकार वाढत आहेत’, असे अनेक तज्ञांचेही मत आहे. आपल्याला घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने भाजीपाल्याची लागवड करून न्यूनतम स्वतःच्या कुटुंबासाठी तरी विषमुक्त अन्न पिकवणे सहज शक्य आहे. चला ! सनातनच्या घरोघरी लागवड मोहिमेत सहभागी होऊन विषमुक्त अन्नाचा संकल्प करूया !’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१.८.२०२२)