सनातन धर्म बनावट, तर शिव काल्पनिक ! – मौलाना नवाब शेख

  • राजमहल (झारखंड) येथील धर्मांध मुसलमानाद्वारे हिंदु धर्माचा अश्लाघ्य अनादर

  • विश्व हिंदु परिषदेच्या नेत्याने तक्रार करूनही मौलानाला अटक नाही !

(मौलाना म्हणजे इस्लामी अभ्यासक)

मौलाना नवाब शेख

साहिबगंज (झारखंड) – राज्यातील राजमहल येथील मौलाना नवाब शेख याने श्रीकृष्णजन्माष्टमीच्या दिवशी हिंदु धर्म आणि देवता यांचा अश्लाघ्य शब्दांत अनादर करणारा संदेश येथील विश्व हिंदु परिषदेचे नेते कालीचरण मंडल यांना पाठवला. त्यामध्ये शेख याने हिंदूंना श्रीकृष्णजन्माष्टमीच्या दिवशी अल्लाची उपासना करण्यास सांगितले होते. तसेच योगी आदित्यनाथ, अमित शहा, मोहन भागवत यांनी इस्लाम स्वीकारावा; कारण हिंदु धर्म बनावट असून हिंदु धर्मात रहाणे अधर्म आहे. शिव काल्पनिक आहे, असे म्हटले होते. याविरोधात मंडल यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली असली, तरी अजूनही शेख याला अटक करण्यात आलेली नाही.

मौलानाने मंडल यांना पाठवलेल्या संदेशात पुढे म्हटले आहे की, कालीदास, तुलसीदास, वाल्मीकि आदींनी रामायण, महाभारत यांसारखे ग्रंथ लिहून लोकांना अधर्माच्या मार्गावर नेले. ही सर्व पुस्तके आणि त्यात लिहिलेली माहिती इस्लाममधून घेण्यात आली आहे. (जर यात तथ्य असेल, तर अधर्माच्या मार्गावर कुणी कुणाला नेले, हे सूज्ञ व्यक्तीस सांगणे न लगे ! – संपादक)

मंडल यांनी दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, मौलाना याने हा संदेश मंडल यांना मुद्दामहून पाठवला, जेणेकरून ते रागाभरात यावर प्रतिक्रिया देतील. याने शहराचे वातावरण बिघडेल, तसेच मंडल यांच्यावर आक्रमण होईल ! प्रत्यक्षात मंडल यांनी यावर कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यांनी मौलानाला अटक करण्याची मागणी केली आहे.

वर्ष २०१९ मध्येही मौलाना शेखचा हिंदु धर्माचे विडंबन करणारा असाच एक व्हिडिओ प्रसारित झाला होता.

संपादकीय भूमिका

  • एखाद्या हिंदूने अशा प्रकारे इस्लामच्या विरोधात टीका केली असती, तर एव्हाना त्याचे शिर धडापासून वेगळे झाले असते अथवा त्याला या स्वरूपाच्या धमक्या मिळाल्या असत्या. हिंदू अतिसहिष्णु असल्यानेच ते त्यांच्या धर्मावरील टीका खपवून घेतात आणि त्याचा वैध मार्गाने निषेधही करत नाहीत. हे हिंदूंना लज्जास्पद !
  • अशा मौलानांच्या मुसक्या आवळून त्यांना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे !
  • आणखी किती दिवस हिंदूंनी त्यांच्या धर्माचा अनादर होतांना पहायचे ? हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत न पहाता केंद्रातील भाजप सरकारने आतातरी कठोर ईशनिंदा कायदा करावा !