झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयाच्या ठिकाणांवरील धाडीमध्ये २ ‘एके-४७’ रायफली सापडल्या !

कपाटांमध्ये मिळालेल्या २ ‘एके ४७’ रायफली

रांची (झारखंड) – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) झारखंडमध्ये अवैध उत्खनन करणार्‍या माफियांवर जवळपास १८ ते २० ठिकाणी धाडी घातल्या. झारखंडचे आमदार पंकज मिश्रा आणि बच्चू यादव यांची चौकशी केल्यानंतर या धाडी घालण्यात आल्या. या दोघांनाही ‘ईडी’ने काही दिवसांपूर्वी अटक केली होती. ‘ईडी’ने मार्चमध्ये मिश्रा आणि इतरांविरुद्ध ‘पी.एम्.एल्.ए.’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून धाडी घालणे चालू केले. याच अंतर्गत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय प्रेम प्रकाश यांच्या ठिकाणांवर धाडी घातल्या आहेत. त्यांच्या कपाटांमध्ये २ ‘एके ४७’ रायफली मिळाल्या आहेत.