सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचा स्थानिक नेता अकबर खान याच्याकडून हिंदु शिक्षकाला शाळेत घुसून मारहाण !

शुक्रवारी विद्यार्थ्यांना नमाजपठणास जाऊ न दिल्याच्या कथित आरोप

पोलिसांकडून प्रथम गुन्हा नोंदवण्यास नकार, तर नंतर नमाजाचा उल्लेख वगळून गुन्हा नोंद !

सिंहभूम (झारखंड) – येथील गोइलकेरा क्षेत्रातील एका सरकारी शाळेमध्ये शुक्रवारी विद्यार्थ्यांना नमाजासाठी जाऊ न दिल्याच्या कथित आरोपावरून सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचा स्थानिक नेता अकबर खान याने शाळेत घुसून विद्यार्थ्यांसमोर शिक्षक रमेंद्र दुबे यांना मारहाण केली. या संदर्भात दुबे स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यासाठी गेले असता पोलिसांनी अकबर खान सत्ताधारी पक्षाचे नेते असल्याने त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यास नकार दिला; मात्र दुसर्‍या दिवशी गुन्हा नोंदवून घेण्यात आला. गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांनी दुबे यांच्याकडून दुसर्‍यांदा तक्रार लिहून घेतली आणि त्यातून नमाजाचा उल्लेख काढला. दुबे यांनी अकबर खान यांच्यामुळे त्यांच्या जिवाला धोका असल्याचे सांगून संरक्षण मागितले आहे. दुबे यांचे म्हणणे आहे की, खान हे राज्यमंत्री जोबा मांझी यांच्या जवळचे आहेत.

१. दुबे यांचे म्हणणे आहे की, मी कधीही मुलांना नमाजपठणास मज्जाव केलेला नाही; मात्र तरीही अकबर खान यांनी म्हटले की, त्यांना मुलांनी सांगितले की, त्यांना नमाजपठणासाठी जाऊ देण्यात आले नाही.

२. अकबर खान यांनी याविषयी म्हटले की, मारहाणीची कोणतीही घटना घडलेली नाही. राजकीय षड्यंत्राद्वारे मला यात गोवण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

  • सत्ताधारी पक्षाचे गुंडगिरी करणारे नेते ! एका शिक्षकाला शाळेत घुसून आणि तेही विद्यार्थ्यांसमोर मारहाण करण्याचे धाडस होतेच कसे ? याविषयी आता निधर्मीवादी संघटना आणि पक्ष तोंड उघडतील का ?
  • सत्ताधारी पक्षाचे बटिक बनलेले झारखंड पोलीस ! असे पोलीस कधीतरी कायद्याचे राज्य देतील का ?