(म्हणे) ‘पाकिस्तानच्या फाळणीतून भारताची निर्मिती झाली !’

‘दैनिक न्यूयॉर्क टाइम्स’चा भारतद्वेष

न्यूयॉर्क (अमेरिका) – पाकिस्तानच्या फाळणीतून भारताची निर्मिती झाल्याची माहिती दैनिक ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने नुकतीच प्रकाशित केली. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेत्या गीतांजली श्री यांनी लिहिलेल्या आणि डेझी रॉकवेल यांनी भाषांतरित केलेल्या ‘टाँब ऑफ सँड’ या हिंदी कादंबरीवर आधारित ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने लिहिलेल्या एका लेखात ही माहिती देण्यात आली आहे.

या कादंबरीचे कथानक एका भारतीय महिलेच्या भारतापासून विभाजित होऊन धर्माच्या आधारावर निर्माण झालेल्या पाकिस्तानला भेट देण्याच्या अचानक घेतलेल्या निर्णयावर आधारित आहे. न्यूयॉर्क टाइम्सने लेखात तथ्ये फिरवून ‘पाकिस्तानपासून भारत वेगळा झाला, भारतापासून पाकिस्तान नव्हे’, असा दावा केला.

संपादकीय भूमिका

  • भारताची फाळणी होऊन पाकिस्तान निर्माण केला गेल्याचा सुर्यप्रकाशाइतका स्वच्छ इतिहास असतांना केवळ भारतद्वेषापोटी दिशाभूल करणारी विधाने करणारे दैनिक ‘न्यूयॉर्क टाइम्स’ कसली पत्रकारिता करत असेल, हे यावरून लक्षात येते !
  •  याविषयी भारत सरकारने अमेरिकेला खडसावणे आणि अशा फुटकळ वृत्तपत्रावर भारतात बंदी घालणे आवश्यक आहे !