गुंटूर (आंध्रप्रदेश) येथील ‘जिना टॉवर सेंटर’चे नाव पालटण्यासाठी भाजपकडून मोर्चा काढण्याचा प्रयत्न !

पोलिसांनी भाजप नेत्यांना घेतले कह्यात !

अमरावती (आंध्रप्रदेश) – गुंटूर येथील ‘जिना टॉवर सेंटर’चे नाव पालटून माजी  राष्ट्रपती आणि वैज्ञानिक ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यासाठी भाजपकडून येथे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र पोलिसांनी भाजपच्या काही नेत्यांना कह्यात घेतले. यावर भाजपचे राज्यसभेतील खासदार नरसिंह राव यांनी ट्वीट करून विचारले, ‘आम्ही आंध्रप्रदेशात रहातो कि पाकिस्तानात ?’ भाजपचे प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांनी म्हटले की, केवळ आमचाच पक्ष नाव पालटण्याची मागणी करत आहे. (अन्य पक्षांना जिना प्रिय आहेत, असे समजायचे का ? मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी राजकीय पक्ष कोणत्या थराला जाऊ शकतात, त्याचे हे उत्तम उदाहरण होय ! जनताही अशाच राजकीय पक्षांना मत देऊन सत्तेवर बसवते, हे संतापजनक ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • देशाच्या फाळणीला आणि १० लाख हिंदूंच्या हत्याकांडाला उत्तरदायी असणार्‍या जिनाचे नाव या देशात चालते, हे देशवासियांना लज्जास्पद !
  • कुठे ज्यूंवर अत्याचार करणार्‍या हिटलरच्या प्रत्येक सहकार्‍याला शोधून त्याला ठार करणारा इस्रायल, तर कुठे हिंदूंचे हत्याकांड करणार्‍याचे नाव टॉवरला देणारा भारत !