उत्तरप्रदेशमध्ये धर्मांधांकडून पोलीस चौकीवर आक्रमण करत पोलिसांना मारहाण !

वाहतूक पोलिसांनी अडवल्यावर धर्मांधाचा पळून जाण्याचा प्रयत्न : पुढे २० मिनिटांतच धर्मांधांना जमवून पोलिसांवर आक्रमण !

  • पोलीस चौकीवर आक्रमण करून पोलिसांना मारहाण करण्याइतपत धर्मांध उद्दाम झाले आहेत, हे लक्षात घ्या ! अशांना वठणीवर आणण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक ! – संपादक
  • धर्मांधांच्या हातून मार खाणारे पोलीस कधी जनतेचे रक्षण करतील का ? – संपादक

लक्ष्मणपुरी – उत्तरप्रेदशातील मेरठ जिल्ह्यातील नौचंदी येथे १७ जानेवारी या दिवशी धर्मांधांनी पोलीस चौकीवर आक्रमण केले. या वेळी धर्मांधांनी पोलिसांंना मारहाण केली. जमाव हिंसक झाल्यामुळे विविध पोलीस ठाण्यांतून पोलीस कुमक मागवावी लागली. या प्रकरणी पोलिसांनी महबूब, ताहिर, खालिद आणि अन्य यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

१७ जानेवारी या दिवशी पोलीस नेहमीप्रमाणे संध्याकाळी रस्त्यात वाहनांची तपासणी करत होते. त्या वेळी पोलिसांनी दुचाकीवरून जाणार्‍या महबूब याला थांबायला सांगितले; मात्र महबूब पोलिसांचे न ऐकताच तेथून पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याची दुचाकी हस्तगत केली; मात्र घटनास्थळावरून मेहबूब पळून गेला. साधारण २० मिनिटांनी महबूब जमावाला घेऊन पोलीस चौकीच्या ठिकाणी पोचला. त्या वेळी जमावाने पोलिसांना मारहाण केली. त्यानंतर जमाव पोलीस चौकीत घुसला आणि चौकीत तोडफोड करण्यास आरंभ केला. याची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्रकुमार सिंह घटनास्थळी पोचले. त्यांनी घटनास्थळी ताहिर आणि खालिद यांना अटक केली. अन्य पोलीस ठाण्यांतून पोलिसांची कुमक घटनास्थळी पोचल्यावर जमावावर नियंत्रण मिळवण्यात आले. पसार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.