३१ डिसेंबरच्या निमित्ताने ऐतिहासिक स्थळांची विटंबना होऊ नये, याकडे हिंदूंनी गांभीर्याने पहावे ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, परभणी

अधिवक्ता सतीश देशपांडे

हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी प्रशासनाचा दुटप्पीपणा असतो. अन्य पंथियांच्या सणांच्या वेळी आवाज, प्रदूषण आदींची प्रशासनाकडून गंभीरतेने नोंद घेतली जात नाही. केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी शासनाचा दुटप्पीपणा लक्षात येतो; कारण हिंदूसुद्धा उदासीन आहेत. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी कार्यक्रम होत असतील, तर त्याची गंभीर नोंद घेतली जावी, यासाठी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देता येईल. ऐतिहासिक स्थळांची विटंबना होऊ नये, याकडे हिंदूंनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. हिंदूंच्या ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी असे कार्यक्रम होणे, ही सांस्कृतिक आणि राजकीय गुलामी आहे. भारतीय संस्कृतीविषयी पराकोटीची अनभिज्ञता असल्याने युवा पिढीला ऐतिहासिक संदर्भ सांगावे लागतील, अन्यथा भीषण परिणाम होतील.