अनुभवी महिला नसेल, तर किमान रावणाला साहाय्य करणारी शूर्पणखा पदावर बसवू नका !

महिला आयोग अध्यक्षपदाच्या नियुक्तीविषयी भाजपच्या उपप्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांचे ‘ट्वीट’

सौ. चित्रा वाघ

मुंबई – महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण दिवसाढवळ्या फिरत आहेत; पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही, हे लाजिरवाणे आहे. अध्यक्ष लवकर नेमावा; पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कुणी अनुभवी महिला मिळत नसेल, तर किमान रावणाला साहाय्य करणारी शूर्पणखा अध्यक्षपदावर बसवू नका. अन्यथा प्रत्येक वेळी सरकारचे नाक कापले जाईल, असे खळबळजनक ‘ट्वीट’ भाजपच्या उपप्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी केले आहे.

राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद मागील दीड वर्षापासून रिक्त आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या स्थितीविषयी सौ. चित्रा वाघ यांनी वरील ‘ट्वीट’ केले आहे.