‘टिपू (सैतान) ची बाग !’

गोवंडी साहीनाका येथील उद्यानाला (बागेला) क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव देण्याची मागणी समाजवादी पक्षाच्या धर्मांध नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी बाजार आणि उद्यान समितीकडे पत्राद्वारे नुकतीच केली. या मागणीमुळे हिंदुत्वनिष्ठांमध्ये संतापाची लाट उसळली आहे, तर राजकीय पक्ष एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. मुख्य म्हणजे हे उद्यान अद्याप अस्तित्वातच नाही. ज्या उद्यानाचे बांधकामच अद्याप झालेले नाही, त्याचे ‘टिपू सुलतान’ असे नामकरण करण्यासाठी समाजवाद्यांनी थयथयाट करावा, हे अचंबित करणारे आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

टिपूप्रेमी समाजवादी पक्ष

समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्यावर श्रीराममंदिरासाठी लढणार्‍या कारसेवकांना गोळ्या घालून ठार केल्याचे आरोप आहेत. श्रीराममंदिराच्या उभारणीसाठी, रक्षणासाठी हिंदूंना मोगलांच्या विरोधात अनेक शतके रक्तरंजित लढा द्यावा लागला. मुलायमसिंह यादव यांचे कार्य पहाता, ते मोगलांचे वंशज शोभतात. हिंदूंच्या श्रद्धास्थानांना विरोध, तर धर्मांधांचे लांगूलचालन हे समाजवादी पक्षाचे तत्त्वच आहे. टिपू सुलतानने त्याच्या हयातीत क्रूरतेची परिसीमा गाठली होती. ‘हिंदूंचे हत्याकांड करण्यात, हिंदूंना बाटवण्यात, हिंदु स्त्रियांवर अत्याचार करण्यात तैमूर नंतर टिपूचाच क्रमांक लागेल’, असे म्हणावे लागेल. समाजवादी पक्षाचा इतिहास पहाता या पक्षाने टिपूचे नाव उद्यानास देण्याची मागणी करावी, यात वावगे काही नाही. अशा पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून येणे किती धोक्याचे आहे, हे यातून जनतेला लक्षात आले असेल. ‘समाजवादी म्हणजे हिंदुद्रोही’ हे समीकरण यातून लक्षात येते.

प्रतिकात्मक छायाचित्र

आयुक्तांना जाब विचारा !

उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्याला शिवसेना आणि भाजप या दोघांचाही विरोधच आहे; मात्र आता नामकरण त्वरित रहित करण्याचा निर्णय का घेतला जात नाही ? हा प्रश्न हिंदूंना सतावत आहे. यामुळे राष्ट्रप्रेमी हिंदूंमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. ‘आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी कुणाला विचारून या उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याची अनुमती दिली ? त्यांना टिपूचा इतिहास ठाऊक आहे का ?’ याची चौकशी केली पाहिजे. या पूर्ण प्रकरणाची चर्चा होत आहे; मात्र चहल यांना अजूनही या प्रकरणी कुणी जाब विचारलेला नाही. इस्रायलमध्ये कुणी हिटलरचा पुतळा उभारील का ? तेथील रस्त्याला अथवा बागेला हिटलरचे नाव कुणी देईल का ? मग भारतात हे कसे काय चालते ? असे करणे हा हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होय.

धर्मांधांच्या मतांसाठी काहीही करणे

प्रतिकात्मक छायाचित्र

मुळात मुंबईसारख्या हिंदुत्वनिष्ठ पक्षांचे प्राबल्य असणार्‍या ठिकाणीही अशी स्थिती का येते ? ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस-जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांची सत्ता असतांना या आघाडी सरकारने टिपूची जयंती साजरी करण्याचे घोषित केले. हिंदुत्वनिष्ठांनी प्रखर विरोध करूनही तो विरोध मोडून काढून ही जयंती साजरी करण्यात आली. यातून काँग्रेसला आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांना काय मिळाले ? टिपू सुलतानने हिंदूंवर केलेल्या अत्याचारांचा इतिहास अनेक पुस्तकांमध्ये आढळतो, तरीही त्याचा उदो उदो का केला जातो ? त्याचे स्वातंत्र्य चळवळीत काडीचेही योगदान नसतांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणून त्याची प्रतिमा रंगवली जाते. भारतात ३ दशकांपूर्वी त्याच्या नावाची मालिका दूरदर्शनवरून प्रसारित करण्यात आली होती, एवढे त्याचे उदात्तीकरण झाले होते; मात्र काळ पालटला. टिपूचा खरा आणि क्रौर्याने भरलेला इतिहास लोकांना उमगू लागल्यावर त्याचे उदात्तीकरण करण्यावर काही प्रमाणात निर्बंध आले.

टिपू बहुतांश हिंदूंच्या मनातून उतरला असला, तरी त्याचे भूत काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्या मानगुटीवरून उतरलेले नाही. त्याला कारण मोठे आहे. या पक्षांना धर्मांधांची मते हवी आहेत. ‘मोगल आक्रमक असून ते छळाबळाने देहलीच्या तख्तावर बसले असले, तरी त्यांचे उदात्तीकरण केल्यास मुसलमानांची एकगठ्ठा मते मिळतील’, असे या राजकीय पक्षांना वाटते. ‘टिपूने इंग्रजांविरुद्ध काहीतरी कार्य केले आहे’, असे चित्र रंगवल्यास लोक काही काळाने त्याला स्वातंत्र्यसैनिक म्हणून स्वीकारतील असा गोड गैरसमज दोन्ही पक्षांनी करून घेतलेला दिसतो. म्हणजे धर्मांधांची मते मिळतीलच, हिंदूंचीही मिळतील, असे त्यांना वाटते.

मुंबईत अस्तित्वात नसलेल्या उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा घाट घातला जातो, तर अगदी थोडे काम शिल्लक असलेल्या एका पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव तो अपूर्ण असल्याचे सांगत विरोध केला जातो. असे व्हायला हा भारत आहे कि पाक ? महानगरपालिकेचे आयुक्त चहल यांनी याचे उत्तर द्यायला हवे. असे करण्यासाठी त्यांच्यावर कुणी दबाव आणला होता का ? हेही त्यांनी मोकळेपणाने सांगावे. राष्ट्रपुरुष आणि देशभक्त यांची प्रतारणा, तर राष्ट्रद्रोह्यांचे उदात्तीकरण ही दुष्ट प्रवृत्ती होय. ही प्रवृत्ती भारतासाठी धोकादायक असल्याने ती वेळीच रोखायला हवी. उद्यानाला टिपूचे नाव देण्यामागे कोण कोण सहभागी आहेत ? त्या सर्वांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. अन्यथा ही एक पद्धत बनून जाईल. उद्या तैमूर, अकबर, बाबर, मोगल या सर्वांचेच उदात्तीकरण केले जाईल आणि पुन्हा कुणी नवा टिपू जन्माला येईल. हे रोखण्यासाठी या प्रवृत्तीची पाळेमुळे खणून काढणे आवश्यक आहे.