ईदच्या निमित्ताने ‘कुर्बानी’ देण्यासाठी गोवा मांस प्रकल्प चालू करण्याविषयी मुसलमान नेत्यांचा शासनावर दबाव

गोवंशियांच्या हत्येची विकृत परंपरा थांबवण्याचे श्री परशुराम सेनेचे आवाहन

शैलेंद्र वेलिंगकर,अध्यक्ष परशुराम गोमंतक सेना

पणजी, १२ जुलै (वार्ता.) – आगामी ‘ईद’ सणाच्या निमित्ताने ‘कुर्बानी’ देण्यासाठी उसगाव येथील गोवा मांस प्रकल्प चालू करण्यासाठी मुसलमान नेत्यांनी गोवा शासनावर दबाव आणण्यास प्रारंभ केला आहे. भाजपचे प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी मुसलमान नेत्यांसह १२ जुलै या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ईदच्या निमित्ताने ‘कुर्बानी’ देण्यासाठी गोवा मांस प्रकल्प चालू करण्याची मागणी केल्याचे वृत्त आहे.

‘गोवंश रक्षा अभियान’ने गोवा मांस प्रकल्पातील अनधिकृत प्रकार उघडकीस आणल्यापासून हा प्रकल्प वर्ष २०१७ पासून बंद आहे; मात्र शासन गेली काही वर्षे ‘ईद’च्या निमित्ताने ‘कुर्बानी’साठी गोवा मांस प्रकल्प काही दिवसांसाठी चालू करून मुसलमानांच्या मागणीची पूर्तता करत आहे. या काळात गोवा मांस प्रकल्पाच्या १०० अंतरात जमावबंदी आदेश लागू करून याला होणारा विरोध मोडित काढला जात आहे. मुसलमानांनी गोवा मांस प्रकल्प चालू करण्यासाठी शासनावर दबाव आणण्यास प्रारंभ केल्याच्या पार्श्वभूमीवर ‘श्री परशुराम सेने’चे श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांनी एक चलचित्र (व्हिडिओ) सामाजिक माध्यमांत प्रसारित केले आहे.

ही विकृत परंपरा थांबवण्यासाठी गोमंतकातील गोप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी संघटित व्हावे ! – श्री. शैलेंद्र वेलिंगकर, श्री परशुराम सेना

हिंदुत्वनिष्ठ संघटना

‘ईद’च्या निमित्ताने गोवंशियांची हत्या करण्याची विकृत परंपरा थांबवण्यासाठी गोमंतकातील गोप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी संघटित होणे आवश्यक आहे. गोवा ही परशुरामभूमी आहे; मात्र गोवा मांस प्रकल्पात गोवंशियांची हत्या करण्याची अनुमती देऊन गोवा शासन गोव्याचा या प्रतिमेला काळे फासण्याचे काम करणार आहे का ? अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी चालवलेले हे एक षड्यंत्र आहे. ईदच्या निमित्ताने मुसलमानांनी गोवंशियांचा बळी देऊ नये. गायीच्या कुंभाचा सूर्याच्या किरणाकडे संपर्क आल्याने गायीमध्ये औषधी रसायनाची निर्मिती होते. गोवा मांस प्रकल्प कायमचा बंद झाला पाहिजे.’’