ख्रिस्ती असल्याचे सांगून हिंदु महिलेशी विवाह करून फसवणूक करणार्‍या धर्मांधाच्या विरोधात गुन्हा नोंद !

धर्मांधांच्या अशा कृत्यांविषयी ख्रिस्ती संघटना को बोलत नाहीत ?

 

आरोपी समीर कुरेशी

गांधीनगर (गुजरात) – वडोदरा येथील तरसाली भागामध्ये रहाणार्‍या २५ वर्षीय समीर अब्दुलभाई कुरेशी याने इन्स्टाग्रामवरून स्वतःचे नाव ‘सॅम मार्टिन’ असल्याचे सांगून एका हिंदु महिलेशी मैत्री केली. नंतर प्रत्यक्ष भेटून शारीरिक संबंध ठेवण्याचा तिच्यावर दबाव निर्माण केला. तिची आक्षेपार्ह स्थितीतील छायाचित्रे काढून तिला विवाह करण्यास बाध्य केले. विवाह न केल्यास छायाचित्रे सार्वजनिक करण्याची धमकीही दिली. महिलेला कुरेशीचे खरे नाव समजताच तिने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या कायद्यांतर्गत दोषी ठरणार्‍या व्यक्तीला ३ ते ५ वर्षांपर्यंतचा कारावास आणि २ लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येऊ शकतो. जर पीडिता ही अल्पवयीन किंवा अनुसूचित जाती-जमातीमधील असेल, तर दोषी व्यक्तीला ४ ते ७ वर्षांपर्यंतची शिक्षा आणि ३ लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. धर्मांतराच्या प्रकरणात एखाद्या संघटनेचा संबंध असेल, तर शिक्षा ३ ते १० वर्षांपर्यंतही होऊ शकते.