सोलापूर येथे हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प !

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उपस्थित विविध मान्यवर

सोलापूर, २३ जून (वार्ता.) – हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने येथील शिवस्मारक येथे शिवराज्याभिषेकदिन तिथीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विधीवत मंत्रोच्चारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पंचामृताने अभिषेक करण्यात आला. या वेळी उपस्थित राष्ट्र आणि धर्म प्रेमी कार्यकर्त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प केला.

या वेळी माजी महापौर महेश कोठे, नगरसेवक प्रथमेश कोठे, भाजपचे शहर उपाध्यक्ष राजकुमार पाटील, तसेच सर्वश्री सुधीर बहिरवाडे, महेश धाराशिवकर, बाळासाहेब गायकवाड, समर्थ मोठे, रवि गोणे, विश्वनाथ पाटील, प्रमोद सलगर, अंबादास गोरंटला, प्रतिक्षीत परदेशी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.