कोल्हापूर, २१ जून (वार्ता.) – कोरोना संसर्गाच्या कठीण काळात जीव धोक्यात घालून काम करणार्या आशा कर्मचार्यांना यांना प्रतिदिन केवळ ३३ रुपये, तर गटप्रवर्तक यांना केवळ १५ रुपये कामापोटी मिळतात. आरोग्य खात्यासारख्या महत्त्वपूर्ण खात्यात काम करणार्या आशा कर्मचारी, गटप्रर्वतक यांना इतके अल्प वेतन देऊन त्यांचे आर्थिक शोषण होत आहे. तरी हे वेतन वाढवावे, तसेच अन्य विविध मागण्यांसाठी आशा कर्मचारी आणि गटप्रर्वतक यांनी २१ जून या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देऊनही त्याची कोणतीही नोंद न घेतल्याने महाराष्ट्र राज्य आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला. त्याचाच एक भाग म्हणून हा मोर्चा काढला.