कोल्हापूर – शिवसेनेचा ५५ वा वर्धापनदिन जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश ठिकाणी साधेपणाने आणि वृक्षारोपण यांसारख्या सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत हा दिन साजरा करण्यात आला.
१. कागल येथे पंचतारांकीत औद्योगिक वसाहत परिसरात भगवा ध्वजाचे पूजन उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांचे हस्ते, तर ध्वजारोहण जिल्हाप्रमुख श्री. विजय देवणे यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी श्री. संभाजीराव भोकरे म्हणाले, हिंदुत्व आणि मराठी माणूस यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेची ओळख कट्टर हिंदुत्वनिष्ठ पक्ष म्हणून आहे. शिवसेना सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देते. या वेळी सर्वश्री पवन पाटील, प्रभाकर थोरात, निवृत्ती पाटील, नितीन शिंदे, विकास पाटील, विलास चव्हाण उपस्थित होते.
२. कोल्हापूर शहरात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणार्या आधुनिक वैद्यांचा सत्कार पंचगंगा हॉल येथे करण्यात आला.
३. शिवसेना जिल्हा कार्यालय, पद्मा टॉकीज येथे अंगणवाडी आणि आशा कर्मचारी यांना ५५ छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार, युवासेनेचे श्री. मंजित माने, सर्वश्री सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, शशिकांत बीडकर, रणजित आयरेकर, अवधूत साळोखे, शुभांगी पोवार, स्मिता सावंत, पूजा शिंदे यांसह अन्य उपस्थित होते.