भाववृद्धी सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे मार्गदर्शन ऐकत असतांना त्यांच्या दैवी वाणीमुळे वातावरणात पालट होऊन त्यांच्यातील देवीतत्त्व अनुभवणे

सौ. विद्या नलावडे

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भाववृद्धी सत्संगात बोलत असतांना ‘निसर्ग स्तब्ध होऊन सर्व जण त्यांची दैवी वाणी ऐकण्यात तल्लीन होतात’, असे जाणवणे

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भाववृद्धी सत्संगात बोलत असतांना वातावरणात पालट होतो. सर्व सृष्टी शांत होते. लता, वेली आणि निसर्गही स्तब्ध होतो. त्या वेळी वाराही शांत होतो अन् पशू-पक्षीही त्यांची दैवी वाणी शांतपणे ऐकतात. सर्व जण त्यांची वाणी ऐकण्यात तल्लीन होतात. साधकांना त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तीही साधकांना त्रास द्यायचे विसरून जातात आणि त्याही तल्लीन होऊन दैवी वाणी ऐकतात’, असे मला जाणवते.

२. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणजे प्रत्यक्षात देवीचे चालते-बोलते मूर्तीमंत रूप आहे’, असे वाटणे आणि त्यांच्या वाणीतून दैवी ऊर्जा मिळणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे बोलणे ऐकतांना मला स्वतःचा विसर पडतो. भाववृद्धी सत्संग झाल्यावरही मी त्याच भावविश्वात हरवून जाते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाणीत पुष्कळ चैतन्य आहे. ‘भावसत्संग ऐकतांना ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, म्हणजे ‘साक्षात् शिवाची प्रीतीस्वरूप पार्वतीमाता आहे. त्या श्रीरामाच्या भक्तवत्सल, करुणामय सीतामाता आहेत. त्या भक्तांच्या हाकेला धावून येणारी, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी, अज्ञान दूर करून ज्ञान प्रदान करणारी, संकटनिवारण करणारी श्रीविष्णूची लक्ष्मीमाता आहे’, असे मला जाणवते. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणजे प्रत्यक्षात देवीचे चालते-बोलते मूर्तीमंत रूप आहे’, असे मला वाटते. या घनघोर आपत्काळात आम्हाला साक्षात् देवीचे दर्शन होत आहे आणि तिची चैतन्यमय वाणी ऐकायला मिळत आहे. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे प्रत्येक वाक्य आमच्या अंतर्मनात जाते आणि त्यातून आम्हाला दैवी ऊर्जा मिळते.

श्रीविष्णुरूपी गुरूंच्या कृपेनेच मला हे सर्व अनुभवता आले आणि त्यांनीच हे माझ्याकडून लिहून घेतले. त्यासाठी मी गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’ – सौ. विद्या नलावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(२५.२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक