चहाच्या माध्यमातून रज-तम वाढवण्याचा वाईट शक्तींचा प्रयत्न !

चहा-कॉफी यांचे दुष्परिणाम

(प्रतिकात्मक छायाचित्र)

चहा आणि कॉफी यांत दहा प्रकारची विषं असतात.

  • ‘टॅनिन’ विष १८ टक्के असते. ते पोटात छिद्र, वायू उत्पन्न करते.
  • ‘थिन’ नावाचे विष ३ प्रतिशत असते. त्यामुळे वेडसरपणा येतो. हे विष फुप्फुस आणि मस्तिष्क यांत जडपणा निर्माण करते.
  • ‘कॅफिन’ विष २.७५ प्रतिशत असते. ते किडण्या दुर्बळ करते.
  • ‘वॉलाटाइल’ विषाचा आतड्यांवर हानीकारक परिणाम होतोे.
  • ‘कार्बोनिक आम्ल’ यापासून आम्लपित्त (अ‍ॅसिडिटी) वाढते.
  • ‘पॅमिन’मुळे पचनशक्ती दुर्बळ होते.
  • ‘अ‍ॅरोमोलीक’चा आतड्यांवर हानीकारक प्रभाव होतो.
  • ‘सायनोजन’ अनिद्रा, पक्षाघात यांसारखे भयंकर रोग उत्पन्न करते.
  • ‘ऑक्सेलिक आम्ल’ शरिरासाठी अत्यंत हानीकारक ठरते.
  • ‘स्टिनॉयल’ रक्तविकार आणि नपुंसकता उत्पन्न करते.

‘चहा हे पेय सर्वांचेच आवडते आहे. काहींना चहाविना करमत नाही. त्यांना जेवण नसले, तरी चालेल; परंतु चहा पाहिजे असतो. काहींना त्यांची ठरलेली वेळ झाली की, चहा लागतो. चहा नाही मिळाला, तर त्यांना अस्वस्थ होते आणि चहा मिळाल्यावरच त्यांचे काम / सेवा परत चालू होते. त्यांना सुचू लागते. अती चहा पिण्याचे तोटेही अनुभवलेले असतात; परंतु तरीही चहा हवा असतो. चहा पिणे एखाद्या व्यसनाप्रमाणे होऊन सुटत नाही. एखाद्या गोष्टीच्या एवढे आहारी जाणे, ही असामान्य गोष्ट आहे. तसेच या पेयात अशी काही विशेष चव आहे, असेही नाही. एखादा चविष्ट असलेला पदार्थही आपण मर्यादेपर्यंतच खातो. आपण समाधानी असतो. याचे कारण हिंदु पाककला परिपूर्ण आहे. आपल्याकडील सात्त्विक पदार्थ हा चविष्ट असून तो थोडासा खाऊनही तृप्त करणारा आहे. परत त्याविषयी मनात इच्छा होत नाही. उलटपक्षी राजसिक आणि तामसिक पदार्थ हे इच्छा जागृत करणारे असून त्यांविषयीचे विचार मनात परत परत येतात. यातच काहीतरी गूढ आहे; परंतु ते वरकरणी आपल्या बुद्धीला समजत नाही.

बलाढ्य वाईट शक्तींची योजना कशी असते, याचे चहा हे एक उत्तम उदाहरण आहे. हे पेय भारतीय नसून त्रासदायक शक्तीचा साठा घेऊन आलेल्या इंग्रजांनी चहा-संस्कृती आणून तिचे बीज इथे पेरले आणि त्याच वेळी त्याचा प्रसार आपल्या नकळत केला. हे पेय चांगले नसूनही इतर अप्रतिम पेयांच्या तुलनेत चहाची आवड त्रासदायक शक्तीच्या आधारे जनमानसात त्याची छाप पाडून निर्माण केली गेली. नंतर आपल्याला त्याचे व्यसन लावण्यात आले आणि ‘चहा संस्कृती’ची निर्मिती झाली.

काळानुसार धर्म-अधर्माच्या सूक्ष्म-युद्धाचा हा एक भाग आहे. वाईट शक्ती प्रत्येक कृतीतून सत्त्व न्यून करून स्वतःची, म्हणजे त्रासदायक शक्ती वाढवण्याच्या प्रयत्नांत असतात. ते हे कसे काय करतात, हे सर्वसामान्यांच्या लक्षात येण्यासारखे नाही. या प्रकारेही त्यांनी आपली हिंदु संस्कृती लोप पावण्यास आरंभ केला आहे.’

– अज्ञात शक्ती (सौ. रंजना गौतम गडेकर यांच्या माध्यमातून)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.