शिरवळ (जिल्हा सातारा) येथील हॉटेलमध्ये आढळून आले १३ लाख रुपयांचे औषधोपयोगी साहित्य !


सातारा, ११ (वार्ता.) – शिरवळ (जिल्हा सातारा) जवळील पंढरपूर फाटा येथील एका हॉटेलवर अनधिकृतपणे १३ लाख रुपयांच्या औषधोपयोगी साहित्याची साठवणूक केल्याचे उघड झाले. यामध्ये इंजेक्शन सिरिंज आणि इतर साहित्य होते.

याविषयी शिरवळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने हॉटेलवर धाड टाकली. तेव्हा हॉटेलच्या मागील बाजूच्या एका खोलीत हे औषधोपयोगी साहित्य आढळले. पोलिसांनी हे साहित्य कह्यात घेऊन अन्न भेसळ प्रशासनाशी संपर्क साधला आहे. दोषी असणार्‍या प्रत्येकावर कठोर कारवाई करण्याची चेतावणी इंगळे यांनी दिली.