कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करतांना गाफील राहू नका ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

नागपूर – ‘कोरोनाची तिसरी लाट येवो न येवो; पण या लाटेचा सामना करण्यासाठी पूर्ण सिद्धता करा. गाफील राहू नका. विशेषत: कोरोना संक्रमणाच्या काळात सकारात्मकता आणि आत्मविश्‍वास निर्माण होईल, यासाठी आधुनिक वैद्यच अधिक प्रभावशाली कार्य करू शकतात’, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ८ जून या दिवशी येथे केले. भाजप प्रदेश वैद्यकीय आघाडीच्या पदाधिकार्‍यांशी आभासी कार्यक्रमात ते बोलत होते.