वैशाख अमावास्या (१०.६.२०२१) या दिवशी पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी यांचे मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्ताने …
वैशाख अमावास्या (१०.६.२०२१) या दिवशी पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी यांचे मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्ताने नोव्हेंबर २०१९ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले प्राणशक्ती अल्प असूनही पू. शालिनी माईणकरआजी यांना भेटायला त्यांच्या खोलीत गेले होते. तेव्हा त्यांच्यात झालेला संवाद येथे दिला आहे.
पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी मे २०१९ मध्ये (वयाच्या ९० व्या वर्षी) रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाण्यासाठी आल्या होत्या.
१. ‘तुमची मुलगी (सौ. अनुराधा पुरोहित) आता तुमची चांगली सेवा करते ना ?’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विचारल्यावर पू. आजींनी ‘हो’, असे सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले (पू. माईणकरआजींकडे पाहून) : तुमचा चेहरा निर्विचार आहे. तुम्ही आणि या (पू. आजींची मुलगी सौ. अनुराधा पुरोहित) वास्कोला जाणार होता ना ?
पू. माईणकरआजी : हो; पण जिवाला बरे वाटत नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले (दोनदा) : मग यांना (मुलगी सौ. अनुराधा पुरोहित यांना) जाऊ द्या. इतर साधिका (तुमच्या नाती) बघतील तुम्हाला.
पू. माईणकरआजी : हो.
परात्पर गुरु डॉ. आठवले : त्यांना जाऊ दे ना ?
पू. माईणकरआजी : छे नको. मी इथे असतांना ती कशाला वास्कोला ? नको, नको.
परात्पर गुरु डॉ. आठवले : आता या तुमची सेवा चांगली करतात ना ?
पू. आजी : हो.
२. एकमेकांना भेटून आनंदी झालेले परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. आजी !
परात्पर गुरु डॉ. आठवले : पू. आजी आनंदी दिसतात ना ?
सौ. अनुराधा पुरोहित (पू. आजींची मुलगी) : परम पूज्य डॉक्टर, तुम्ही भेटायला आलात; म्हणून आज आजी आनंदी दिसत आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले (पू. आजींना उद्देशून) : तुम्हाला भेटून जेवढा आनंद मिळतो, तेवढा आनंद कुणालाच भेटून मिळत नाही.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला ‘सौ. अनुराधा पुरोहित यांच्याकडून संतसेवा कशी करायची ?’, हे शिकून घेण्यास सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले (त्या वेळी तेथे सौ. संगीता चौधरी होत्या. त्यांना उद्देशून) अरे, तुम्ही इथे कशा ?
सौ. संगीता चौधरी : अधूनमधून आजींच्या सेवेला येते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही पहिल्यांदाच संतसेवा करत आहात ना ? संतसेवा पुण्याईने मिळते. यांच्याकडून (सौ. अनुराधा पुरोहित यांच्याकडून) ती शिकून घ्या.
४. पू. आजींना ‘आज कोण येणार ?’, असे विचारल्यावर त्यांनी ‘राम येणार’, असे सांगणे
सौ. संगीता चौधरी : मी पू. आजींना विचारले, ‘‘आज कोण येणार ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘राम येणार.’’
५. ‘पू. आजींचे मुख आणि छातीपर्यंतचा भाग चांगला वाटतो; परंतु त्यांच्या पायांच्या माध्यमातून काहीतरी वाईट बाहेर पडत आहे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले (कु. पूनम साळुंखे यांना उद्देशून) : ‘पू. आजींना पाहून काय वाटते ?’, ते सांगा.
कु. पूनम साळुंखे : मुख आणि छातीपर्यंत चांगले वाटते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : मुख आणि छातीचा भाग चांगला वाटतो; पण पायांच्या माध्यमातून काहीतरी वाईट बाहेर पडत आहे. त्यामुळे पायांचा रंग निराळा आहे. थोड्या दिवसांनी त्रास न्यून होईल. यांचे मन निर्विचार आणि आनंदी आहे.
६. ‘तुम्हाला बघूनही पुष्कळ आनंद होतो; तुम्ही बोलला नाहीत, तरी चालेल’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. आजींना सांगणे
पू. आजी : परम पूज्य डॉक्टर, पुष्कळ झोप येते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : जागे रहाण्यापेक्षा झोपलेले बरे. मीपण तेच करतो. तुम्हाला बघूनच पुष्कळ आनंद होतो. तुम्ही बोलला नाहीत, तरी चालेल.
७. ‘पू. आजींनी अजून काही वेळ परात्पर गुरु डॉक्टरांना बसायला सांगितल्यावर अजून बसल्यास आसंदीसकट उचलावे लागेल’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : बरं, आता मी येतो.
पू. आजी : एवढ्या लवकर कुठे जाता ? बसा अजून.
परात्पर गुरु डॉ. आठवले : मी अजून बसलो ना, तर मुलांना मला आसंदीसकट न्यावे लागणार.
पू. आजी : बरं, मग परत कधी येणार ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : येतो येतो. लवकर येतो.
(परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. आजी, सौ. अनुराधा पुरोहित आणि सौ. संगीता चौधरी यांना प्रसाद दिला आणि ते निघाले.)
८. सौ. अनुराधा पुरोहित यांनी ‘पहिल्यापेक्षा मनाची स्थिती बरी आहे’, असे सांगितल्यावर ‘हे जमले की, तुम्ही जिंकलात’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले (खोलीच्या बाहेर आल्यावर) सौ. अनुराधा पुरोहित यांना उद्देशून) : तुमच्या मनाची स्थिती आता कशी आहे ?
सौ. अनुराधा पुरोहित : पहिल्यापेक्षा बरी आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हे जमले की, तुम्ही जिंकलात.’
– सौ. अनुराधा पुरोहित, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.५.२०२१)