साधकांना मोक्ष मिळवून देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
मी मी मी, माझे माझे माझे ।
मी मी मी, माझे माझे माझे ।
मी जन्मलो, मी वाढलो; पण मी घडलोच नाही ॥
माझे लग्न, माझी बायको, माझी मुले यांत मी रमलो ।
सर्वशक्तीमान, कृपासागर गुरुमाऊली, याचे मला भान नाही ॥ १ ॥
तूच माझा भूतकाळ, तूच माझा वर्तमानकाळ अन् तूच भविष्य ।
द्या मजसी कृपाशीर्वाद, तव चरणी झिजवाया निज आयुष्य ॥
७८ वा हा जन्मोत्सव, असे साधकांसी पर्वणी ।
प्रत्यक्ष गुरुमाऊली वर्तती, मोक्षपदी जाण्याची सारणी ॥ २ ॥
महापूर हा भावसागराचा, गंगा-यमुनेला आली भरती ।
महिमा गुरुमाऊलींचा सांगा हो साधकजन, वर्णावा तरी किती ॥
परात्पर गुरु डॉक्टर, गुरुदेव, गुरुमाऊली, साधक तव संबोधिती ।
द्या हो द्या आता करूनी, आम्हा पामरांना मोक्षप्राप्ती ॥ ३ ॥
तूच ब्रह्मा, तूच विष्णु, तूच महेश, या जन्मोत्सवी आली याची प्रचीती ।
अखंड परिश्रमे आपण केली, प.पू. भक्तराज बाबांची भक्ती ।
अन् अनुभवली या योगे तव बालकांनी, एका दिनाची मुक्ती ॥ ४ ॥
हे गुरुराया, साधकांचे आपणच कल्पवृक्ष अन् कनवाळू ।
कैसे तव चरणी अभिषेकाप्रीत्यर्थ, अश्रू मी गाळू ।
लागली तवचरणांची आस, या जिवा हे दयाळा ।
द्यावा प्रसाद झडकरी आता, रामनाथीवासी हे कृपाळा ॥ ५ ॥
॥ गुरुचरणार्पणमस्तु ॥
– श्री. राजेश कोरगावकर, म्हापसा, गोवा. (१७.५.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |