जगभरात ११० कोटी लोक करतात धूम्रपान !

५ पुरुषांपैकी एकाचा धूम्रपानाशी संबंधित आजारांमुळे होतो मृत्यू !

तंबाखूमुळे मिळणार्‍या महसुलाचा विचार करून जगातील एकही देश तंबाखू संबंधित उत्पादनांवर बंदी घालत नाहीत, हे लक्षात घ्या ! तसेच भारतातील आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवल्यामुळे जनता मद्य, तंबाखू आदी व्यसनांच्या आहारी जाते, हे लक्षात घ्या !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नवी देहली – जगभरात ११० कोटी लोक धूम्रपान करतात. वर्ष १९९० नंतर जगभरात धूम्रपान करणार्‍या १५ कोटी लोकांची यात भर पडली. जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने हा आकडा १३० कोटींहून अधिक आहे. प्रत्येकी ५ पुरुषांपैकी एकाचा धूम्रपानाशी संबंधित आजारांमुळे मृत्यू होत आहे. एका नव्या अभ्यासात ही गोष्ट समोर आली आहे. संशोधकांनी २०४ देशांतील आकडेवारीचे विश्‍लेषण करून हा निष्कर्ष काढला आहे.

अभ्यास प्रकल्पाच्या प्रमुख मॅरिसा रेटस्मा म्हणाल्या की, जगभर तरुणांना व्यसन जडलेले दिसते. वर्ष २०१९ मध्ये सुमारे ८० लाख लोकांचा धूम्रपानामुळे मृत्यू झाला. धूम्रपानातून हृदयरोगामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १० लाख ७० सहस्रांपेक्षा अधिक आहे. श्‍वासनलिका, फुप्फुसाचा कर्करोग इत्यादींमुळे १० लाख ३० सहस्र लोकांचा मृत्यू झाला. हृदयाघातामुळे सुमारे १० लाख लोकांचा मृत्यू झाला.