किशोर घाटगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आशा वर्कर, कर्मचारी यांना ‘ऑक्सिमीटर’, ‘हॅन्डग्लोज’, तसेच अन्य साहित्य प्रदान !

आशा वर्कर, कर्मचारी यांना ‘ऑक्सिमीटर’ तसेच अन्य साहित्य प्रदान करतांना किशोर घाटगे (डावीकडून दुसरे), तसेच अन्य

कोल्हापूर – संयुक्त उत्तरेश्‍वर पेठ आणि शुक्रवार पेठ शिवसेना शाखा यांच्या वतीने शिवसेनेचे किशोर घाटगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंचगंगा लसीकरण केंद्र येथील आशा वर्कर, कर्मचारी यांना ‘ऑक्सिमीटर’, ‘हॅन्डग्लोज’ आणि ‘मास्क’ प्रदान करण्यात आले. या वेळी श्री. किशोर घाटगे, सर्वश्री सुरेश कदम, संजय देसाई, सनी अतिग्रे, राकेश पोवार उपस्थित होते.

या वेळी डॉक्टर सौ. रुपाली यादव म्हणाल्या, ‘‘शिवसेनेच्या वतीने लसीकरण केंद्राला नेहमीच सहकार्य असून गर्दीच्या वेळी कार्यकर्त्यांकडून रांगा लावणे, रांगेतील लोकांना पाणी-बिस्किटे वाटप करणे, लसीकरणाविषयी मार्गदर्शन करणे, असे साहाय्य केले जाते. भविष्यातही हे सहकार्य कायम असू दे.’’