रुग्णांकडून आकारलेली रक्कम परत करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाचे निर्देश

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील रुग्णालयांना निर्देश लागू

सोलापूर – मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने राज्यशासनाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील रुग्णालयांनी रुग्णांकडून आकारलेली रक्कम परत करण्याविषयी कोणती कार्यवाही केली ? याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच संबंधित रुग्णालयावर कोणती कारवाई केली ? याचा अहवालही न्यायालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेचा लाभ घेणार्‍या रुग्णांना या निर्णयाचा लाभ होईल.

योजनेत समाविष्ट असणारी काही रुग्णालये रुग्णांकडून रक्कम घेत असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी याचिका प्रविष्ट केली होती. रुग्णांना हानीभरपाई देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.