‘न मे भक्त साधकः प्रणश्यति ।’ देती वचन परात्पर गुरु डॉक्टर साधकांसी ।

परात्पर गुरु डॉ. आठवले

सर्व साधकांचे रक्षण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

पू. अशोक पात्रीकर

आपत्काळाची लागे साधका चिंता ।
असेल हा भीषण काळ कसा ।
श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई देती उत्तर त्याचे भावसत्संगातूनी ॥ १ ॥

ठेवूनी श्रद्धा गुरुचरणी ।
नेतील ते आपत्काळी तारूनी ।
वाढवूया साधना तन, मन अन् धन अर्पूनी गुरुचरणी ॥ २ ॥

जैसे दिधले वचन श्रीकृष्णाने भक्तांना ।
न मे भक्तः प्रणश्यति ।
अर्थ असे त्याचा नाश ना पावे भक्त कधी माझा ॥ ३ ॥

तैसे वचन दिले श्री गुरूंनी (टीप १) साधकांना ।
न मे भक्त साधकः प्रणश्यति ।
अर्थ असे त्याचा नाश ना पावे भक्त साधक माझा ॥ ४ ॥

असे साधकांची श्रद्धा गुरुचरणी ।
पण श्रद्धा नसे पुरेसी आपत्काळी ।
बनूया साधक भक्त तरून जाण्या या भीषण आपत्काळी ॥ ५ ॥

टीप १ : परात्पर गुरु डॉक्टरांनी

– (पू.) श्री. अशोक पात्रीकर, अमरावती (१.२.२०२१)