उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. हृषिकेश विशाल पवार हा आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !
|
जळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला चि. हृषिकेश विशाल पवार याचा वैशाख शुक्ल पक्ष सप्तमी (१९ मे २०२१) या दिवशी दुसरा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्याचे वडील सनातनचे साधक श्री. विशाल पवार आणि त्याची आई सौ. वैदेही पवार यांनी चि. हृषिकेशच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतरचे केलेले लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. १९ मे या दिवशी चि. हृषिकेश याच्या जन्माच्या तिसर्या मासापर्यंतची माहिती पाहिली. आज या लेखाचा अंतिम भाग
या आधीचा लेख पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/478122.html
वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेले आई-वडील आणि सात्त्विक बाळ यांच्या संदर्भातील एक अभूतपूर्व उदाहरण !‘आई-वडील सात्त्विक असले, तर त्यांच्यापोटी सात्त्विक बाळ जन्माला येते. असे सर्वसाधारणपणे घडते. आई-वडिलांना अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असूनही त्यांच्या पोटी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले सात्त्विक बाळ जन्माला येणे आणि ते आईच्या पोटात असल्यापासूनच त्याच्या आई-वडिलांना बाळाच्या केवळ अस्तित्वाने आध्यात्मिक लाभ होणे, हे अभूतपूर्व आहे. इतिहासात असे उदाहरण वाचायला मिळालेले नाही. हे उदाहरण आम्हाला सविस्तर माहितीसह दिल्याविषयी श्री. विशाल आणि सौ. वैदेही पवार यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे. ‘बाळामुळे विशाल आणि सौ. वैदेही यांची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’ – (परात्पर गुरु) डॉक्टर आठवले |
५. बाळाचा जन्म
५ ई. चौथा मास
१. ‘हृषिकेश प्रतिदिन झोपेतून हसतच उठतो. ४ मासांचा झाला, तरी त्याला रडणे ठाऊक नाही. तो सतत हसत असतो.
२. ऑगस्ट २०१९ मध्ये एकदा सकाळी मी बाळाला बाळगुटी दिली. गुटी उगाळून झाल्यावर मी त्यासाठी वापरत असलेला दगड पुसून पूर्ण स्वच्छ केला. संध्याकाळी पुन्हा गुटी उगाळून देण्यासाठी तो दगड काढला असता त्यावर त्रिशुळाचा आकार उमटलेला दिसला.’ – सौ. वैदेही पवार
५ उ. पाचवा मास
५ उ १. शेजार्यांच्या वागण्यात पालट होणे : ‘आमच्या घरासमोर एक अन्य पंथीय कुटुंब रहाते. ३५ वर्षे आमच्या शेजारी असूनही आमच्यात म्हणावी तितकी जवळीक नव्हती. आम्ही साधना करतो; म्हणून आम्हाला पाहून थुंकणे, अशा काही कृती त्यांच्याकडून होत असत. बाळ झाल्यापासून मात्र त्यांच्या वागण्यात सकारात्मक पालट जाणवला.
५ उ २. रात्री हृषिकेशला ‘नामजप करायचा आहे’, असे सांगितल्यावर रात्रभर त्याच्या बोटांच्या मुद्रा केलेल्या दिसणे : १४.९.२०१९ या दिवशी रात्री मी हृषिकेशला सांगितले, ‘‘आपल्याला नामजप करायचा आहे.’’ आम्ही पती-पत्नींनी ९.३० ते १० या वेळेत नामजप केला. रात्री ३ वाजता पत्नीला जाग आल्यावर तिला हृषिकेशच्या दोन्ही हातांची तर्जनी आणि अंगठा ही बोटे जोडलेली दिसली. पहाटे ४ वाजता मला जाग आली. तेव्हाही हृषिकेशच्या दोन्ही हातांच्या बोटांच्या तशाच मुद्रा केलेल्या मला आढळल्या.
५ उ ३. हृषिकेशने त्याला दिलेली १०० रुपयांची नोट हातात घेऊन ती परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राजवळ ठेवणे : १५.९.२०१९ या दिवशी आम्ही सौ. आरती कोमटी यांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या घरातून निघतांना त्यांनी हृषिकेशच्या हातात १०० रुपयांची नोट दिली. त्या वेळी त्याला भूक लागली असल्यामुळे तो किरकिर करत होता; पण त्याने ती नोट हातात घेतली आणि जवळच असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राजवळ अलगद ठेवली. त्याच्या या कृतीचे सर्वांनाच आश्चर्य वाटले.
५ उ ४. स्वप्नात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ येणे : १८.९.२०१९ या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ माझ्या स्वप्नात आल्या. त्यांनी हृषिकेशच्या शरिराला स्पर्श केला आणि म्हणाल्या, ‘अरे, याच्यात नामजपाविना काहीच शेष नाही.’ त्या वेळी ‘श्री. अनिरुद्ध राजंदेकर त्या क्षणाचे छायाचित्र काढत आहेत’, असेही मला दिसले. मी वर्ष २०१३ मध्ये सनातनच्या रामनाथी आश्रमातून घरी आल्यापासून ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ मला साधनेविषयीचे मार्गदर्शन करत आहेत’, असे स्वप्न मला सतत पडायचे. आज प्रथमच माझ्या स्वप्नात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आल्या.
५ उ ५. परात्पर गुरुदेवांप्रती हृषिकेशला असलेली ओढ ! : एक दिवस हृषिकेश झोपलेला असतांना मी त्याच्या शेजारी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ ठेवला. त्याने एका अंगावर होऊन परात्पर गुरुदेवांच्या चित्राच्या दिशेने डोके केले. या वेळी ‘त्याला ग्रंथावर डोके ठेवून नमस्कार करायचा आहे’, असे मला जाणवले. हृषिकेश त्याच्याजवळ ठेवलेल्या परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राकडे जातो आणि छायाचित्राशी खेळतो.
५ उ ६. वडिलांनी ‘पहाटे उठून नामजप करावा’, यासाठी हरप्रयत्न करून त्यांना उठवणारा हृषिकेश ! : हृषिकेश जन्मापासूनच माझ्याकडे सतत पहाण्याचा प्रयत्न करत असे. नंतर त्याला मान धरता येऊ लागल्यावर तो जाग आली की, रात्रभर श्रीकृष्णाच्या चित्राकडे, तर काही वेळ माझ्याकडे पहात असे. झोपेत मला ‘माझ्याकडे कुणीतरी पहात आहे’, असे जाणवायचे; म्हणून मी उठून पाहिले, तर त्याची दृष्टी माझ्यावर असायची. नंतर साधारण ५ व्या मासापासून तो पहाटे उठून माझे केस ओढायचा आणि मी प्रतिसाद न दिल्यास माझ्या डोळ्यांत बोट घालून मला उठवायचा. जोपर्यंत मी उठत नाही, तोपर्यंत तो असे करायचा. त्यामुळे शेवटी नाईलाजाने मला उठावे लागायचे. मी उठल्यावर तो आनंदाने हसायचा.
५ ऊ. अकरावा मास
५ ऊ १. त्रास असणार्या व्यक्ती आणि संत यांच्यातील भेद लक्षात येणे : मी हृषिकेशला ‘हरि ॐ तत्सत् ।’ हा नामजप शिकवत असल्याचे एक चलच्चित्र आहे. ते चलच्चित्र पाहिल्यावर हृषिकेश हसायचा आणि नामजप केल्याप्रमाणे मान हालवायचा. एप्रिल २०२० मध्ये माझा आध्यात्मिक त्रास पुष्कळ वाढला. त्या वेळी त्याला माझ्या समवेतचे ते चलच्चित्र दाखवल्यावर पुष्कळ मारल्याप्रमाणे तो रडायला लागला. नंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्याला मांडीवर घेतल्याचे चलच्चित्र पाहून मात्र तो हसायला लागला आणि भ्रमणभाष जवळ घेऊन तो त्याकडे कौतुकाने पाहू लागला.
५ ऊ २. सात्त्विक गोष्टींकडे आकृष्ट होणे : हृषिकेश श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहातांना बोलतो, हसतो आणि रडतोही. परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पहातांना तो त्यांना पहातो, हसतो आणि ‘जणूकाही ते प्रत्यक्ष त्याच्यासमोरच आहेत’, अशा पद्धतीने त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असतो.’ – श्री. विशाल पवार
५ ए ३. हृषिकेशचे वैशिष्ट्यपूर्ण खेळ : ‘त्याचे खेळणे इतर मुलांपेक्षा वेगळे असल्याचे जाणवते. तो स्वयंपाकघरात असल्यास गॅसच्या शेगडीकडे पहात असतो. त्या वेळी बाजूला पडलेल्या अन्य कोणत्याही वस्तू न घेता तो अग्नीचे निरीक्षण करत असतो किंवा त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या गोधडीवर वेगवेगळ्या कलाकृती आहेत. त्यातील फुलांना स्पर्श करून तो त्यांना अनुभवण्याचा किंवा तोडण्याचा प्रयत्न करतो.’ – सौ. वैदेही पवार, जळगाव
६. हृषिकेशचे स्वभावदोष
‘हट्टीपणा करणे आणि स्वतःची खेळणी इतरांना न देणे
७. हृषिकेशच्या जन्मापासून झालेले आध्यात्मिक त्रास
बाळाचा जन्म झाल्यापासून माझ्या आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण पुष्कळ वाढत गेले. माझा राग इतका वाढला की, आरंभीचे १५ दिवस मी अनेक वेळा जेवणाचे ताट हवेत फेकून द्यायचो. माझे डोळे रागाने मोठे होत. कधीकधी ‘पत्नीला मारावे’, असे विचार यायचे. माझ्या शरिराची आग होण्याचे प्रमाण अधिक वाढले होते. त्या वेळी प्रत्येक क्षणी शांत असलेले बाळ पाहून माझे मन स्थिर होत असे आणि माझ्याकडून झालेल्या चुकांची मला जाणीव होत असे. त्या काळात माझी ताई मला सांगत असे, ‘‘हे बाळ पुष्कळ सात्त्विक आहे. तुम्हा दोघांचा अहं आणि बुद्धी यांचा लय करण्यासाठी ते जन्माला आले आहे. त्याची सात्त्विकता सहन न झाल्यामुळे तू असा वागत आहेस.’’
(बाळाचे वडील श्री. विशाल यांना अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असल्याने वडिलांना त्रास व्हायचा. असे होण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. यावरून ‘बाळ किती सात्त्विक आहे’, ती कल्पना येते. – संकलक)
(समाप्त)
– श्री. विशाल पवार, जळगाव
|