सर्वांवर कृपावर्षाव करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
१. कोरोना महामारीचा आश्रमातील साधकांवर कुठलाच परिणाम न होणे
‘कोरोना महामारीने जगभरात थैमान घातल्याने जगभरातील लोक त्रस्त झाले आहेत. कोरोनाविरुद्ध प्रतिकारक्षमता वाढावी आणि आध्यात्मिक बळ मिळावे, यासाठी आश्रमातील साधक प्रार्थना आणि नामजप करू लागले. आश्रमातील साधकांवर कोरोना महामारीचा कुठलाच परिणाम जाणवला नाही. तेव्हा साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांतील ईश्वरी शक्तीची प्रचीती आली. ते साक्षात् श्री कृष्ण आहेत.
२. ‘ईश्वरी राज्यात (हिंदु राष्ट्रात) कशी व्यवस्था असेल ?’, याची अनुभूती येणे
या महामारीमुळे लोकांच्या जीवनात मोठे पालट झाले. काहींचे कामधंदे बंद झाले. काहींची ‘एका वेळचे जेवण मिळेल कि नाही ?’, अशी परिस्थिती झाली; मात्र परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने श्रीकृष्णाने आमची काळजी घेतली. परम पूज्यांनी आम्हाला वैकुंठात ठेवले. त्यांनी आम्हाला ‘ईश्वरी राज्यात कशी व्यवस्था असेल ?’, याची अनुभूती दिली. आम्ही त्यांच्या चरणी कृतज्ञ आहोत.
३. कृष्ण गोकुळवासियांचे रक्षण करायचा, तसे परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांचे रक्षण करणे
आज सर्व जगाला कोरोनारूपी राक्षसाने विळखा घातला आहे; मात्र गुरुदेवांनी आम्हाला त्यातून अलगद बाहेर काढले. कंस गोकुळवासियांना त्रास देण्यासाठी राक्षस पाठवायचा; मात्र कृष्ण त्यातून सर्वांना अलगद बाहेर काढायचा. त्याप्रमाणे गुरुदेव आम्हाला संकटातून बाहेर काढत आहेत.
परात्पर गुरु डॉक्टरांचे नाव घेतल्याने आमचे पाप आणि त्यामुळे निर्माण होणारे भय नाहीसे झाले. आम्ही शरणागतभावाने त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (पू.) श्री. सदाशिव सामंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.९.२०२०)