‘योगः कर्मसु कौशलम् ।’ या भावाने सेवा करणारे वैभववाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील कै. प्रमोद सुतार !

कै. प्रमोद सुतार

१. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ बस्तू बनवण्याची कला अवगत असणे

‘एकदा प्रमोददादांना भंगार साहित्यामध्ये उभी चीर गेलेले एक फावडे टाकलेले दिसले. त्यांनी ते घेऊन त्याला ‘वेल्डिंग’ केले आणि मला वापरण्यासाठी दिले. त्यांनी एका ‘व्हिडिओ’मध्ये उंदीर पकडण्यासाठी एका रुंद तोंडाच्या प्लॅस्टिकच्या बालदीचा वापर केलेला पाहिला. त्यांनी टाकाऊ साहित्यातून आम्हाला उंदीर पकडण्यासाठी तशी बालदी बनवून दिली. त्यांनी मला सांगितले, ‘‘पीव्हीसी’ पाईपचा वापर करून वानरांना पळवण्यासाठी एक यंत्र सिद्ध करायचे आहे.’’

२. प्रमोददादांना बर्‍याच औषधी वनस्पती ठाऊक होत्या. ते त्या वनस्पतींची रोपे मिळवून ती आश्रमात लावण्यासाठी आणून द्यायचे.

श्री. रामचंद्र कुंभार

३. सेवेची तळमळ 

अ. त्यांची माझ्याशी १० ते १२ वर्षांपासून जवळीक आहे. त्यांच्या विवाहाला केवळ ८ दिवस शेष असतांना ते आश्रमात सेवा पूर्ण करण्यासाठी थांबले होते. त्या वेळी त्यांची सेवा थांबवून त्यांना घरी पाठवावे लागले.

आ. ते दीड वर्षांपूर्वी आमच्या घरी सुतारकाम करण्यासाठी आले होते. तेव्हा काम लवकर आणि चांगल्या पद्धतीने होण्यासाठी ते माझ्या मुलाला घेऊन लाकूड कापण्याच्या कारखान्यात (सॉ-मीलवर) गेले. त्यांनी लागणारे साहित्य मापात कापून घेतले आणि घरातील मुख्य दरवाजा आणि अन्य साहित्य बनवून दिले.

४. प्रमोददादांना इतरांच्या चुका लक्षात आल्यास ते संबंधितांना त्यांच्या चुका शांतपणे सांगायचे.

प.पू. गुरुदेवांनी आम्हाला अशा गुणी साधकांच्या सहवासात रहाण्याची संधी दिल्यामुळे त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. रामचंद्र कुंभार, सनातन आश्रम, गोवा. (६.४.२०२१)