संतांनी एकामागोमाग एक देहत्याग करणे, ही आपत्काळाची नांदीच !

(श्रीसत्‌शक्‍ति) सौ. बिंदा सिंगबाळ

‘वर्ष १९९८ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आगामी भीषण काळाविषयी सांगतांना एका सार्वजनिक प्रवचनात सांगितले होते, ‘पुढे एवढा भीषण काळ येणार आहे की, संतांनाही वाटेल, ‘डोळे मिटले असते, तर बरे झाले असते !’ सध्या कोरोना या जागतिक महामारीमुळे लोकांचे अतिशय हाल होत आहेत आणि किडामुंगीप्रमाणे लोक मरत आहेत. अशा भीषण काळातच विविध ठिकाणच्या संतांनी देहत्याग केल्याची वृत्तेही येत आहेत. गेल्या ८ दिवसांत देहत्याग केलेल्या संतांची नावे पुढे सारणीत दिली आहेत.

संतांना आपत्काळात सूक्ष्मातून अधिक कार्य करता येते; म्हणून काळाची आवश्यकता ओळखून ते देहत्याग करतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या आपत्काळाची ही नांदीच आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपत्काळाला तोंड देण्यासाठी सनातन संस्थेचे साधक समाजात जाऊन साधना करण्याविषयी जगभरातील जिज्ञासू, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करत आहे. ‘साधना केली, तरच आपण या आपत्काळात तरून जाणार आहोत’, हे लक्षात घेऊन आतापासूनच साधनेसाठी झोकून देऊन प्रयत्न करा.’

– (श्रीसत्‌शक्ति) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.५.२०२१)