आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ? तरीही गेली २३ वर्षे मला स्थुलातून त्यांच्या जवळ रहाण्याचे भाग्य त्यांच्याच कृपेने लाभले आणि त्यांच्या माध्यमातून स्थापन होणार्‍या सनातन धर्मराज्याची (हिंदु राष्ट्राची) जडण-घडण होतांना मला ‘याची देही याची डोळा’ प्रत्यक्ष पहाता आली. जे माझ्या लक्षात आले, ते मी त्यांच्याच कृपेने लिहीत आहे. १३ मे या दिवशी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या संशोधनाचे महत्त्व हा भाग पाहिला. आज त्या पुढील जाहीरसभा हा भाग पाहूया.

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! : https://sanatanprabhat.org/marathi/476598.html


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थुलरूपातील कार्य

२६. जाहीर (सार्वजनिक) सभा

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अध्यात्मप्रसाराच्या सार्वजनिक सभांना श्रोत्यांची लाभलेली उदंड उपस्थिती

२६ अ. सभेसाठी लागणारे व्यासपीठ स्वतः साधकांकडून करवून घेणे : ‘समाजामध्ये साधना या विषयावर जागृती करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये १९९६ – ९७ या कालावधीत अनेक सार्वजनिक प्रवचने केली. ही प्रवचने मोकळ्या मैदानांत करण्यात आली. या प्रवचनांसाठी मोठे लाकडी व्यासपीठ वापरले जायचे. हे व्यासपीठ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतः साधकांकडून सिद्ध (तयार) करवून घेतले. या व्यासपिठाची रचना, ते पूर्ण सिद्ध करणे; ३ राज्यांत ते सहज फिरवता येईल, असे त्याचे छोटे भाग बनवणे, हे सर्व त्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनानुसार करण्यात आले.

डॉ. (सौ.) नंदिनी सामंत

२६ आ. सभेसाठी आवश्यक साहित्य नेण्यासाठी उपयोगात आणल्या जाणार्‍या ट्रकच्या दर्शनी भागावर राष्ट्र आणि धर्म यांविषयीची सूत्रे रंगवून घेणे : त्या व्यासपिठासमवेत कालमहिम्यानुसार आवश्यक मोठी देवतांची चित्रेही बनवण्यात आली. या सर्व साहित्यासमवेत एक विद्युत् जनित्रही असायचे. व्यासपिठाचे आणि सभेसाठी आवश्यक असे हे अन् अन्य साहित्य सर्वत्र नेण्यासाठी एक ट्रक वापरला जायचा. त्याच्या दर्शनी भागावर राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रबोधनपर लिखाण करण्यात आले होते. हे वैशिष्ट्यपूर्ण लिखाण आणि त्याची ट्रकवरची संरचना, रंगकाम, हे सर्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतः करवून घेतले होते.

२६ इ. सभेच्या सेवेतून साधकांना ईश्‍वराला अपेक्षित अशी सेवा शिकण्याची संधी देऊन काटकसर आणि परिपूर्ण सेवा करण्यास शिकवणे : या सेवेच्या माध्यमातून अनेक साधकांना प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली परिपूर्ण आणि ईश्‍वराला अपेक्षित सेवा शिकण्याची अन् करण्याची संधी मिळाली, तसेच प्रत्येक सार्वजनिक प्रवचनासाठी व्यासपीठ आणि विद्युत् जनित्र इत्यादींसाठी लागणारा पैसा वाचला. आपलेच सर्व असल्यामुळे इतरांवर कोणत्याही गोष्टीसाठी अवलंबून रहावे लागले नाही. साधक व्यासपीठ उभे करणे आणि नंतर ते सुटे करून परत ट्रकमध्ये भरणे यात एवढे पारंगत झाले की, ते ही सेवा ३ – ४ घंट्यांतच करत असत.

२६ ई. साधकांना शिस्त लावून समाजासमोर आदर्श निर्माण करणे : ‘समाजात राजकारणी किंवा अन्य संस्था यांचे मोकळ्या जागेत सार्वजनिक कार्यक्रम झाल्यानंतर मैदान पुष्कळ अस्वच्छ होते’, असा नेहमीचा अनुभव आहे; परंतु सनातनची सभा होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर मैदान पूर्ण स्वच्छ करण्याची शिस्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना लावली. समाजासमोर यातून एक मोठा आदर्श निर्माण झाला.

२६ उ. प्रत्येक वस्तूचा आवश्यकतेनुसार आणि पुरेपूर उपयोग करण्यास शिकवणे : पुढे जाहीर प्रवचने नसतांना हा ट्रक सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे फिरते प्रदर्शन लावण्यासाठी वापरात आला. अनेकदा साधकांच्या घराचे स्थलांतर किंवा तत्सम साहित्याचे स्थलांतर असल्यास हा धर्मरथ साधकांना उपलब्ध असे.

२७. प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांचे ध्वनीचित्रीकरण आणि ध्वनीमुद्रण जतन करणे

सर्वोच्च कोटीच्या संतांनी स्वतः लिहिलेली, स्वरबद्ध केलेली आणि स्वतः गायलेली भजने म्हणजे चैतन्याचा खजिनाच होय. असा अमूल्य खजिना असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांचे ध्वनीचित्रीकरण, तसेच ध्वनीमुद्रण त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक त्यांच्या भक्तांकडून जमा केले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ज्या भजनांचे ध्वनीचित्रीकरण आणि ध्वनीमुद्रण उपलब्ध नव्हते, अशा भजनांची सूची प.पू. भक्तराज महाराज यांना देऊन आणि त्यांना प्रार्थना करून त्यांच्याकडून ती गाऊन घेतली आणि त्यांचे ध्वनीमुद्रण करून ठेवले आहे. भजनांचे ध्वनीचित्रीकरण, तसेच ध्वनीमुद्रण केल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रत्येक भजनाचे संकलन करून ते उत्तम गुणवत्तेच्या स्थितीला आणून त्यांचा सुरक्षासाठा घेऊन ठेवला. त्या वेळी त्यांनी हे सर्व द्रष्टेपणाने केले; म्हणून पुढील पिढ्यांना हा अमूल्य असा चैतन्याचा ठेवा अनुभवायला आणि अभ्यास करायला मिळणार आहे. आजपर्यंत अनेक साधकांना या भजनांतील चैतन्याने त्यांच्या साधनेत त्या-त्या वेळी अमूल्य असे साहाय्य झाले आहे, तसेच आध्यात्मिक त्रास असलेल्या अनेक साधकांना या भजनांच्या माध्यमातून आध्यात्मिक लाभ होणे आणि अभूतपूर्व भावजागृती होणे अनुभवले आहे.

२८. ध्वनीचित्रीकरण सेवेची घडी बसवणे 

चित्रीकरण व ध्वनीचित्र-संकलन यांविषयी मार्गदर्शन:‘स्टुडिओ’तअनेक कॅमेर्‍यांद्वारे चित्रीकरण आणि त्याच वेळी ‘स्टुडिओ’बाहेर ध्वनीचित्र-संकलन कक्षात त्या चित्रीकरणाचे संकलन केले जात असतांना त्याविषयी साधकांना मार्गदर्शन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले (वर्ष २००६)

२८ अ. पुढील पिढ्यांसाठी आध्यात्मिक दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रसंग आणि घटना यांचे चित्रीकरण करणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातन संस्था स्थापन करण्यापूर्वीही अनेक संतांच्या भेटी घेतल्या आहेत आणि स्वतः त्यांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. या सर्वांचे त्यांनी चित्रीकरण करून ठेवले आहे. सनातन संस्थेची स्थापना झाल्यानंतर आध्यात्मिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण घटना, विविध संत, कार्यक्रम इत्यादींचे नियमितपणे ध्वनीचित्रीकरण करणे होऊ लागले. सध्या सनातनकडे अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत दुर्मिळ आणि अन्यत्र कुठेही असण्याची अगदी किमान शक्यता असलेले शेकडो घंट्यांचे ध्वनीचित्रीकरण उपलब्ध आहे. यामागे ‘पुढील पिढ्यांना या सर्वांचा सत्संग लाभावा आणि अभ्यास करता यावा’, असा उद्देश होता.

२८ आ. ध्वनीचित्रीकरण आणि संकलन यांसारख्या गोष्टींचे सात्त्विकीकरण करण्यास शिकवणे : परात्पर गुरु डॉ. आठवले ‘ध्वनीचित्रीकरण आणि पुढे त्याचे संकलन यांची आदर्श सात्त्विक पद्धत कशी असावी ?’, हे प्रत्येक चित्रीकरणातून शिकवत गेले. ‘छायाचित्रकाचा (कॅमेर्‍याचा) कोन (अँगल) कोणता असावा ? प्रकाशयोजना, वेषभूषा, केशभूषा या गोष्टी आणि संगीत कोणते असावे ?’ याविषयी त्यांनी वेळोवेळी शिकवून धोरणे निश्‍चित करून दिली. यातून लक्षात आले की, ‘अन्यत्र केलेले ध्वनीचित्रीकरण आणि त्याचे संकलन किती रज-तम प्रधान असते ?’ त्याने दर्शकाची वृत्ती बहिर्मुख आणि रज-तम प्रधान बनते. त्यामुळे ‘पुढील पिढ्यांचा विचार करून प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आणि सात्त्विकीकरण या दृष्टीने चित्रीकरण करून ठेवणे, हा त्यांचा द्रष्टेपणाच नाही का ?’ (क्रमश: सोमवारच्या अंकात)

– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.४.२०१७)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.