रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ? तरीही गेली २३ वर्षे मला स्थुलातून त्यांच्या जवळ रहाण्याचे भाग्य त्यांच्याच कृपेने लाभले आणि त्यांच्या माध्यमातून स्थापन होणार्‍या सनातन धर्मराज्याची (हिंदु राष्ट्राची) जडण-घडण होतांना मला ‘याची देही याची डोळा’ प्रत्यक्ष पहाता आली. जे माझ्या लक्षात आले, ते मी त्यांच्याच कृपेने लिहीत आहे. १२ मे या दिवशी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले अध्यात्म शास्त्रातील अद्वितीय संशोधन हा भाग पाहिला. आज त्याचा पुढील भाग पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! : https://sanatanprabhat.org/marathi/476240.html


२४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या संशोधनाचे महत्त्व

संतांच्या बोलण्याचा होणारा सकारात्मक परिणाम अभ्यासण्यासाठी प.पू. डॉक्टर साधिकेशी १५ मि. बोलल्यावर तिच्या कुंडलिनीचक्रांचा ‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफिक स्कॅनिंग’द्वारे केलेला अभ्यास. १. सूक्ष्म परीक्षण करतांना सौ. योया वाले (१८.१०.२०११)

२४ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले आध्यात्मिक त्रासाच्या संदर्भातील संशोधन म्हणजे मानव जातीला त्यांनी दिलेले अमूल्य वरदान असणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक त्रासांवर हे अनमोल संशोधन केले नसते, तर अनेक साधकांना ‘स्वतःला आध्यात्मिक त्रास आहे’, हेच समजले नसते. समजा एखाद्याला समजलेही असते, तरी त्यावर त्याने काय उपाय केला असता ? परात्पर गुरु डॉक्टरांनी या संशोधनाचा उपयोग भविष्यात अनेक पिढ्यांनाही सहजतेने उपलब्ध करून दिला आहे. या संशोधनाची अभ्यासपूर्ण माहिती सनातनची नियतकालिके, ग्रंथ आणि संकेतस्थळे यांच्या माध्यमातून प्रसिद्ध केली आहे. या संशोधनात्मक माहितीचा जगभरातील अनेकांनी आतापर्यंत लाभ घेतलाही आहे. त्यामुळेच या विषयात ‘आध्यात्मिक त्रासाचे प्रकार, त्रासाचे निदान आणि त्यावरील उपाय’ यांसंदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मूलभूत संशोधन हे ‘मानवजातीला त्यांनी दिलेले अमूल्य वरदान आहे.

प.पू. डॉक्टरांनी एका यज्ञाचा संकल्प केल्यावर त्यांच्या उजव्या हातात कार्यरत झालेल्या ऊर्जेचे ‘थर्मल इमेजिंग कॅमेर्‍या’द्वारे परीक्षण करतांना (‘रीडिंग’ घेतांना) श्री. शॉन क्लार्क (वर्ष २०१६)

२४ आ. आजच्या युवा पिढीला अध्यात्मशास्त्राचे महत्त्व समजावून देण्यासाठी आधुनिक उपकरणांद्वारे संशोधन करणे : परात्पर गुरु डॉ. आठवले अध्यात्माकडे वळण्यापूर्वी संशोधक होते. त्यांनी इंग्लंड मधील त्यांच्या ७ वर्षांच्या वास्तव्यात वैद्यकीय संमोहन उपचारा संदर्भात संशोधन केले होते. त्यांचा मूळ पिंडच संशोधकाचा असल्याने त्यांनी अध्यात्मशास्त्र आणि त्याच्याशी निगडित सर्व विषयांकडे एक ‘जिज्ञासू संशोधक’ या अभ्यासू वृत्तीने पाहिले. वेदांपासून सनातन धर्मात सांगितलेले शास्त्र पूर्ण सत्य असले, तरी आजच्या युवा पिढीला मुळात धर्मशिक्षणच नसल्याने आणि तिच्यावर पाश्‍चिमात्य संस्कृतीचा प्रभाव असल्याने ‘युवा पिढीला प्रत्यक्ष प्रमाण दिल्यावाचून विषय पटत नाही’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जाणले; म्हणूनच त्यांनी अध्यात्म शास्त्राच्या अंतर्गत सांगितलेल्या अनेक गोष्टी आधुनिक उपकरणांचा उपयोग करून प्रत्यक्ष प्रमाणाद्वारेही सिद्ध करून दाखवल्या. यासाठी ते अजूनही सतत दक्ष असतात आणि प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण घटना इत्यादीचे चित्रीकरण अन् त्याविषयी आधुनिक उपकरणांनी संशोधन करत आहेत.

२४ इ. अनेक दुर्मिळ उपकरणांचे तंत्रज्ञान साधकांना ज्ञात नसूनही सनातनच्या संपर्कात आलेले आणि हितचिंतक यांच्या साहाय्याने संशोधन करून माहिती प्रसिद्ध करणे : सनातनच्या संपर्कात आलेले किंवा आश्रमात आलेले हितचिंतक यांच्याकडे संशोधनास उपयुक्त असे एखादे आधुनिक उपकरण असल्यास ‘त्यांच्या वेळेत आणि त्यांच्या अनुमतीने शक्य तेवढे अधिकाधिक संशोधन कसे करता येईल ?’, असे नियोजन परात्पर गुरु डॉक्टरांनी सतत केले आहे. त्यामुळे अनेक दुर्मिळ, महागडी उपकरणे, ज्यांचे तंत्रज्ञान साधकांना ज्ञात नसूनही परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांचा उपयोग करून एकूणच मानवजातीसाठी अमूल्य असे विपुल संशोधन करून ठेवले आहे आणि ते आजही अथकपणे करत आहेत. या संशोधनाचे निष्कर्ष त्यांनी वेळोवेळी सनातनची नियतकालिके, ग्रंथ आणि संकेतस्थळे यांवरून प्रसिद्धही केले आहेत.

डॉ. (सौ.) नंदिनी सामंत

२५. साधकांना आत्मोन्नतीसाठी उपलब्ध करून दिलेले साधन – ‘भावजागृती !’

२५ अ. भावजागृतीसाठीच्या अनंत पद्धती शिकवणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना आत्मोन्नतीसाठी उपलब्ध करून दिलेले एक महत्त्वाचे साधन म्हणजे ‘भावजागृती !’ ‘भावजागृतीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न कसे करायचे ? ते वरचेवर (सतत) का करायचे ?’, या समवेतच भावजागृतीसाठीच्या अनंत पद्धती परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवल्या. एवढेच करून न थांबता त्यांनी ‘सर्व साधक भावजागृतीसाठीचे प्रयत्न करत आहेत ना’, याचा सतत पाठपुरावाही घेतला. फलस्वरूप आज संस्थेतील जवळपास प्रत्येक साधक प्रतिदिन भावजागृतीसाठी प्रयत्न करत आहे आणि भाव अनुभवतही आहे. या भावाच्या बळावर साधकांना त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे कठीण शल्यकर्मही सुसह्य बनले.

२५ आ. सनातनच्या संपर्कात आलेल्या समाजातील प्रत्येक जिज्ञासूकरता भावजागृती सत्संग उपलब्ध करून देणे : भावजागृतीचे महत्त्व जाणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने या विषयावर शिबिरांचे आयोजन झाले. त्याही पुढे जाऊन या विषयावर साप्ताहिक सत्संगांचे आयोजन करण्यात आले आणि आता तर संगणकीय प्रणालीद्वारे (राष्ट्रीय स्तरावर) भावजागृती सत्संगांचे आयोजन केले जाते. असे सत्संग हिंदुत्वनिष्ठ, हितचिंतक आणि सनातन प्रभात नियतकालिकांचे वाचक यांच्यासाठीही उपलब्ध करून दिले आहेत. किती ही प्रीती !’

(क्रमश: उद्याच्या अंकात)

– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.४.२०१७)