ढेबेवाडी (जिल्हा सातारा) येथील कोविड स्मानभूमीत मृतदेह घेऊन जाण्यासाठी नातेवाइकांना करावी लागते कसरत !

प्रशासनाने नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करून द्यावा, ही अपेक्षा !

सातारा, १२ मे (वार्ता.) – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील कोविड स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता जोरदार पावसामुळे वाहून गेला आहे. शववाहिका स्मशानभूमीपर्यंत नेण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे संबंधित कर्मचार्‍यांना बाधितांचे मृतदेह कसरत करत खांद्यांवर उचलून न्यावे लागत आहेत.

ढेबेवाडी येथील वांग नदीजवळ कोविड स्मशानभूमी आहे. ढेबेवाडी आणि पंचक्रोशीतील कोविडने मृत्यू झालेल्या नागरिकांचे अंत्यसंस्कार याठिकाणी होतात; मात्र मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे स्मशानभूमीचा रस्ता वाहून जाऊन मोठ्या चरी निर्माण झाल्या आहेत. त्यातुन चारचाकी वाहन जाणे अवघड झाले आहे. त्यामुळे संबंधित कार्मचार्‍यांना कोविड मृतदेह अक्षरश: खांद्यावर उचलून न्यावा लागत आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी ढेबेवाडीचे सरपंच आत्माराम पाचपुते यांनी केली आहे.