महाभयंकर आपत्काळातही श्रीगुरु आपले रक्षण करणार आहेत !

परात्पर गुरु डॉ. आठवले

येणार्‍या काळात विश्वयुद्ध होणार आहे. हे युद्ध कसे असेल, तर ‘ते शिवाच्या तांडवासारखे आहे’, असे म्हणता येईल. जेव्हा भगवान शिव तांडव करतो, तेव्हा संपूर्ण पृथ्वीवर प्रलय होतो. (येणार्‍या काळात होणार्‍या विश्वयुद्धाला महर्षींनी शिवाच्या तांडवाची उपमा दिली आहे, यावरून युद्ध किती भयंकर असणार आहे याची कल्पना येते. – संकलक)

येणार्‍या काळात पृथ्वीवर सर्वत्र अग्नीचे आणि पाण्याचे भय आहे म्हणजे चक्रीवादळ, पाऊस, ज्वालामुखी आदि नैसर्गिक आपत्तीही मोठ्या प्रमाणात होणार आहेत. एका वाक्यात सांगायचे झाले, तर सर्वत्र मृत्यू, मृत्यू आणि मृत्यूच असणार आहे. काळ असा येईल की, जेव्हा वाटेल मृत्यू पृथ्वीवर थैमान घालत आहे. या सर्व संकटांत श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेव आपले रक्षण करतील. ‘परात्पर गुरुदेवांमुळे आपण काळालाही जिंकू शकतो’, असे दैवी बळ साधकांना प्राप्त झाले आहे. – सप्तर्षि (संदर्भ : सप्तर्षि जीवनाडीवाचन क्र. १४८, ३०.०९.२०२०)