सांगली, २ मे – रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे मिरज येथील शासकीय रुग्णालयातील परिचारिक सुमित हुपरीकर आणि दाविद वाघमारे या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गेल्या आठवड्यात अटक केली होती. या प्रकरणी परिचारिक हुपरीकर याला निलंबित करण्यात आले आहे. सुमित आणि दाविद यांनी रेमडेसिविर इंजेक्शन ३० सहस्र रुपयांना विकले होते.