सातारा जिल्ह्यातील २० लाख ४२ सहस्र नागरिकांना मिळणार लस !


सातारा, २५ एप्रिल (वार्ता.) – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील १८ वर्षे वयावरील अनुमाने २० लाख ४२ सहस्र ५४४ नागरिकांना लस मिळणार आहे.

२४ एप्रिल या दिवशी २ सहस्रांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सातारा जिल्ह्यात आढळून आले असून ३४ जणांना प्राण गमवावे लागले. सातारा जिल्ह्याची लोकसंख्या ३० लाख ३ सहस्र ७४१ आहे. त्यातील १८ वर्षांवरील लोकसंख्या २० लाख ४२ सहस्र ५४४ असून ४५ वर्षांवरील लोकसंख्या ९ लाख ३७ सहस्र १५३ आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४ लाख ५४ सहस्र ६८८ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.