निपाणी – वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार निपाणी पोलिसांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा बंद केल्या आहेत. यात प्रामुख्याने आप्पाचीवाडी-म्हाकवे, बेनाडी-सुळकुड, मांगूर-यळगुड, निपाणी-मुरगुड सीमांचा समावेश आहे. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी पथकर नाक्यावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन यांच्याकडून महाराष्ट्रातून कर्नाटकात येणार्या नागरिकांची संपूर्ण कागदपत्रे पडताळूनच प्रवेश द्या, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत सीमा बंद रहाणार आहेत.
कर्नाटक पोलिसांच्या या कृतीमुळे महाराष्ट्रवासियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येक वेळी कर्नाटक प्रशासन नेहमी या ना त्या निमित्ताने महाराष्ट्रातील नागरिकांची अडवणूक करते याउलट महाराष्ट्र शासन मात्र नेहमीच कर्नाटकच्या नागरिकांना सहकार्य करते, अशी प्रतिक्रिया अनेक मराठी बांधवांना व्यक्त केली आहे.