पुरोहितांना ५ सहस्र रुपयांचे आर्थिक साहाय्य करा ! – निखिल लातूरकर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

लातूर – कोरोना महामारीचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी दळणवळण बंदी घोषित करतांना दैनंदिन पूजा आणि धार्मिक विधी करून त्यावर उपजिवीका करणार्‍या पुरोहितवर्गाला मात्र वगळण्यात आले. दळणवळण बंदी घोषित केल्याने पुरोहितांना यजमानांनी नेमून दिलेल्या पूजा विधीवर निर्बंध आलेत. त्यामुळे राज्यातील पुरोहितवर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर पुरोहितवर्गाची अडचण लक्षात घेऊन या पुरोहितवर्गासाठी ५ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी अखिल भारतीय महासंघाचे अध्यक्ष श्री. निखिल लातूरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.