मोहोळ (जिल्हा सोलापूर) – मोहोळ तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून आजपर्यंत ३१ सहस्र रॅपिड अँटिजेन टेस्ट, तर १५ सहस्र आर्.टी.पी.सी.आर्. चाचण्या झाल्या आहेत. तालुक्यातील ७ गावांची हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल चालू असून सर्व्हे करण्यासाठी एकूण ३७६ पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण पाथरुटकर यांनी दिली.
तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी कोविड सेंटर चालू केले असून त्यांची ३०० रुग्णांची क्षमता आहे. भविष्यात रुग्णांची संख्या वाढली तर शहरापासून जवळच असलेल्या बी.पी.एड्. महाविद्यालयातही रुग्णांची व्यवस्था करण्यात येणार आहे.