कुडाळ – सिंधुदुर्ग जिल्ह्यात संचारबंदी चालू असतांना अनावश्यक फिरणार्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. १४ एप्रिलला कुडाळ येथे मास्क न लावल्याविषयी विचारले म्हणून पोलिसांशी भांडण करून पसार झालेल्या वेंगुर्ले तालुक्यातील खवणे येथील वरूण शामसुंदर ठाकुर या युवकाला पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन कह्यात घेतले. ठाकुर याला पोलिसांनी न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्याची वैयक्तिक हमीपत्रावर मुक्तता केली.
सावंतवाडी शहरात संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी विनाकारण फिरणार्या एका २२ वर्षीय युवकावर पोलिसांनी १५ एप्रिलला गुन्हा नोंद केला, तर अन्य काही जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.