पाकमध्ये आतंकवाद्यांकडून न्यायमूर्तींसह तिघांची हत्या

पाकमध्ये अराजक !

कुटुंबियांसमवेत पेशावर-इस्लामाबाद या मार्गावरून जात असतांना गोळीबारात न्यायमूर्ती आफताब आफ्रिदी यांच्यासह तिघांचा मृत्यू.

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या स्वात जिल्ह्यातील आतंकवादविरोधी न्यायालयाचे न्यायमूर्ती आफताब आफ्रिदी हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत पेशावर-इस्लामाबाद या मार्गावरून जात असतांना आतंकवाद्यांनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात आफ्रिदी यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला. त्यांच्यासमवेत असणारे अंगरक्षक घायाळ झाले आहेत.

पोलिसांनी आफ्रिदी यांच्या कुटुंबियांचीही चौकशी चालू केली आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांना संशय आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी या आक्रमणाचा निषेध केला आहे. ‘या आक्रमणातील दोषींवर कारवाई करण्यात येणार असून लवकरच त्यांना अटक केली जाईल’, असेही त्यांनी म्हटले.