उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. दिवित सार्थक मुक्कड हा एक आहे !
वाढदिवसाच्या दिवशी ऑनलाईन सत्संगात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
जबलपूर (मध्यप्रदेश) – भगवान श्रीकृष्णाकडे आकर्षित होणारा, देवपूजेत रमणारा चि. दिवित सार्थक मुक्कड याची फाल्गुन शुक्ल पक्ष द्वादशी म्हणजेच २६ मार्च या त्याच्या वाढदिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करण्यात आली. एका ‘ऑनलाईन’ सत्संगात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ही आनंदवार्ता दिली. या वेळी चि. दिवित याचे वडील श्री. सार्थक मुक्कड, आई सौ. श्वेता मुक्कड, आजोबा श्री. भूषण मुक्कड, आजी सौ. सीमा मुक्कड, मावशी सौ. रश्मी शर्मा आणि आजी सौ. रिचा वर्मा (आईची आई) यांच्यासह अन्य साधक उपस्थित होते.
या वेळी प्रारंभी चि. दिवितची गुणवैशिष्ट्ये विचारल्यावर दिवितची आजी सौ. सीमा मुक्कड म्हणाल्या की, चि. दिवित काहीही शिकवले, तर लगेच शिकतो. चालायला, हात जोडायला लगेच शिकला. त्याला केवळ एकदाच शिकवायला लागते. तो लगेच ग्रहण करतो. तो त्रास देत नाही. रडत नाही.
दिवितची आजी सौ. रिचा वर्मा म्हणाल्या की, दिवित संभाजीनगरला आला होता. त्या वेळी श्रीकृष्णाच्या चित्राकडे तो सारखा आकर्षित होत होता. ‘जसे कृष्णाला मीठीच मारण्याचा प्रयत्न करत होता’, असे वाटले. दिवित चे आजोबा श्री. भूषण मुक्कड म्हणाले की, त्याला प्रतिदिन टिळा लावायला आवडतो. तो सर्वांमध्ये पटकन मिसळून जातो. सर्वांशी बोलण्याचा आणि हसण्याचा प्रयत्न करतो.
१. जन्मापूर्वी
१ अ. गर्भारपणी झालेली साधना !
१. ‘ईश्वरकृृपेने दिवितच्या जन्मापूर्वी मी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप, तसेच हनुमान चालीसाचे पठण करत होते. तेव्हा ‘गर्भ हनुमानचालीसा ऐकत असून त्याला ते चांगले वाटत आहे’, असे मला जाणवत होते.
२. मी संभाजीनगरला गेले होते. तेव्हा पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांनी मला कालभैरवस्तोत्र आणि संकटनाशक श्री शाबरीदेवीस्तोत्र वाचायला सांगितले होते. मी ते वाचत होते. त्यामुळे माझा आत्मविश्वास पुष्कळ वाढला होता.
१ आ. सहावा मास – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना भेटण्याची संधी मिळणे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रार्थना केल्यावर पुष्कळ लाभ होणे : मला सहावा मास चालू असतांना प.पू. गुरुदेवांच्या कृपेने सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना भेटण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली. त्यांनी मला प्रार्थना करायला सांगितल्या. त्याचा मला पुष्कळ लाभ झाला. त्यांना भेटतांना ‘साक्षात् गुरुदेवच भेटत आहेत’, असे मला वाटत होते. तेव्हा ‘देवाने जणू माझ्यासाठीच सद्गुरु पिंगळेकाकांच्या माध्यमातून गुरुदेवांना जबलपूरला पाठवले आहे’, असे मला वाटले आणि गुरुमाऊलीच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
१ इ. आठवा मास – परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाचा सोहळा पहातांना गर्भाने पुष्कळ हालचाल करणे, तेव्हा ‘गर्भाला पुष्कळ आनंद होत आहे’, असे जाणवणे : आठवा मास चालू असतांना मला गुरुदेवांच्या जन्मोत्सवाचा सोहळा पहाण्याची संधी लाभली. त्या सत्संगात प.पू. गुरुदेवांची आरती चालू असतांना मी दोन्ही हात जोडून उभी होते. तेव्हा गर्भाची पुष्कळ हालचाल होत होती. ‘गर्भाला पुष्कळ आनंद होत आहे’, असे मला जाणवत होते.
२. जन्मानंतर
२ अ. जन्म ते ३ मास
२ अ १. शरिरावर दैवी कण दिसणे : बाळाचा जन्म झाला. तेव्हा रुग्णालयात त्याच्या अंगावर दैवी कण आढळले. त्यामुळे सर्वजण म्हणत होते, ‘याच्या अंगावर हे दैवी कण कसे आले आहेत?’
२ अ २. सात्विकतेची ओढ
अ. बाळ (दिवित) रडत असतांना त्याला देवघरात नेल्यावर तेे शांत होत असे.
आ. अंघोळ झाल्यावर दिवित झोपला की, त्याच्या हाताच्या बोटांची मुद्रा केलेली असायची.
२ आ. वय – ४ ते ६ मास
१. एकदा मी त्याला खोलीत दूध पाजत होते आणि देवघरात त्याची आजी आरती करत होती. तेव्हा त्याने दूध पिता पिताच आपले हात जोडले. जोपर्यंत आरती चालू होती, तोपर्यंत त्याचेे हात नमस्काराच्या मुद्रेत होते.
२. दिवितला ‘कृतज्ञता गीत’ पुष्कळ आवडते. तो रडत असतांना ‘कृतज्ञता गीत’ लावल्यावर तो लगेच शांत होऊन ते ऐकतो आणि पुष्कळ आनंदी होतो.
३. दिवितला पहिल्यांदा लसीकरण (वॅक्सिनेशन) केले. तेव्हा त्याला ताप आला. मी हनुमान चालीसा लावल्यावर तो शांतपणे ऐकू लागला मी हनुमान चालीसा म्हणत असतांना ‘तोसुद्धा म्हणत आहे’, असे मला जाणवत होते.
२ इ. वय – ७ ते ९ मास
२ इ १. देवाची ओढ
अ. त्याची आजी प्रतिदिन पूजा करतांना त्याला आपल्यासह देवघरात घेऊन जाते. तेव्हा तो तिथे बसून टाळ्या वाजवतो. त्याला तेथे पुष्कळ आवडते. दिवितला बाहेर फिरायला जायलाही पुष्कळ आवडते. त्याचे आजोबा त्याला फिरायला घेऊन जातांना देवघरात आरती चालू असेल, तर तो ‘मला देवघरात जायचे आहे’, असे खूण करून सांगतो आणि रडतो.
आ. दिवित ७ मासांचा असतांना मी संभाजीनगरला गेले होते. घरातील श्रीकृष्णाचे मोठे चित्र पाहून त्याला पुष्कळ आनंद व्हायचा. त्याला श्रीकृष्णाच्या चित्राला हात लावायला आवडायचे.
२ ई. वय – ८ ते ११ मास
१. त्याला ‘ॐ नमः शिवाय ।’ आणि ‘हर हर गंगे’, असे म्हणून अंघोळ घातलेली पुष्कळ आवडते. त्या वेळी तो आनंदाने टाळ्या वाजवतो.
२. संभाजीनगर येथील साधिका कु. चैताली डुबे आणि कु. प्रियांका लोणे एकदा आमच्या घरी आल्या होत्या. त्यांना पहाताच तो स्वतःहून नमस्कार करत होता. बराच वेळ तो नमस्काराच्या मुद्रेतच होता.
३. स्वभावदोष
हट्टीपणा
‘हे गुरुदेवा, हे श्रीमन्नारायणा, आपल्याच कृपेने चि. दिवितची गुणवैशिष्ट्ये माझ्या लक्षात आली आणि आपणच ती माझ्याकडून लिहून घेतली. यासाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. श्वेता मुक्कड, जबलपूर, मध्यप्रदेश. (८.२.२०२१)
चि. दिवित जन्मतः दैवी गुण घेऊन आला आहे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेसद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘चि. दिवित जन्मतः दैवी गुण घेऊन आला आहे. दैवी बालकांमध्ये अन्य बालकांच्या तुलनेत विलक्षण गुण असतात. पूर्वजन्मीच्या साधनेमुळे त्याचा जन्म साधना आणि धर्मकार्यासाठीच झाला आहे. त्याला लहानपणी डोक्याला शिखेजवळ झालेल्या जखमेची खूण, हा एक संकेतच आहे. शिखेच्या माध्यमातून दैवी स्पंदन आकर्षित करण्याची प्रक्रिया होत असते. ब्रह्मरंध्रातून तो ईश्वराचे विचार ग्रहण करत असल्याचे त्यातून लक्षात येते. बालकाचे माता-पिता आणि त्यांचे ही माता-पिता यांच्या साधनेचा परिणाम म्हणून दैवी बालक जन्म घेतात. आता दिवित मधील देवत्व जागृत ठेवण्यासह त्याच्यावर योग्य संस्कार करण्याचे उत्तरदायित्व परिवाराचे आहे.’’ |
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |