परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाच्या वेळी देहली येथील साधकांना आलेल्या अनुभूती

अनुभूतीच्या माध्यमातून साधकांना आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉक्टरांच्या चैतन्याने प्रार्थना आणि स्वयंसूचना सत्र यांच्या प्रयत्नांमध्ये वाढ होणे : ‘जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाच्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली. रात्री झोपल्यावर मला असे जाणवले की, ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या जवळ झोपलो असून त्यांनी ‘जणू मृत पेशींना प्रभारित केले आहे.’ त्यानंतर माझ्या प्रार्थना आणि स्वयंसूचना सत्र यांच्या प्रयत्नांमध्ये वाढ झाली.’ – श्री. आनंद बल्लव

२. परात्पर गुरु डॉक्टर समवेत असल्याचे जाणवणे : ‘सकाळी फिरायला जातांना ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्या समवेत आहेत’, असे मला वाटत होते. नंतर थोडासा पाऊस पडला. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या वाढदिवसाच्या दिवशी पावसाने त्यांचे स्वागत केले’, असे मला जाणवले.

३. मन आनंदाने भरून जाणे : माझ्या मनात ‘मी आज रामनाथी आश्रमात असायला हवे होते’, असा विचार आला. तेव्हा माझ्या अंगाला वार्‍याची झुळूक स्पर्श करून गेली. त्या वेळी मला ‘ती वार्‍याची झुळूक परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांना स्पर्श करून मला त्यांचा प्रसाद द्यायला आली आहे’, असे वाटले. त्यामुळे माझे मन आनंदाने भरून गेले.

४. परात्पर गुरु डॉक्टरांविषयी कृतज्ञताभाव वाढणे : भावसोहळ्यातील सूत्रे ऐकतांना ‘आम्ही काय काय चुका केल्या’, याची मला जाणीव होऊन मला खंत वाटली. परात्पर गुरु डॉक्टरांविषयी कृतज्ञताभाव पुष्कळच वाढला होता. त्या दिवशी डोळ्यांतून सारखे आनंदाश्रू वहात होते आणि मन एकदम हलके अन् प्रसन्न झाले होते.’

– सौ. स्वप्नजा तळेगावकर (वर्ष २०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक