पंढरीच्या नाथा, नेतोस का रे तुझ्या पंढरीला ।

श्री. सुधाकर जोशी

पंढरीच्या नाथा,
कटेवरी हात ठेवूनी उभा ।
कपाळी केशरी टिळा ।
वाट पाहून माझे डोळे थकले रे ।
कार्तिकी एकादशीला तरी माझा हात धरून ।
नेतोस का रे तुझ्या पंढरीला ॥ १ ॥

चंद्रभागेच्या वाळवंटी कथा-कीर्तन ऐकूनी ।
माझ्या जीवनाचे सार्थक होऊ दे ।
पंढरीच्या वाटेवरी माझा हात धरून ।
नेतोस का रे तुझ्या पंढरीला ॥ २ ॥

कित्येक वारकरी येतात तुझ्या दर्शनाला ।
महाद्वारी जमला भक्तांचा मेळा ।
कळसाचे दर्शन घेऊन मी जाईन माघारा ।
आतातरी माझा हात धरून ।
नेतोस का रे तुझ्या पंढरीला ॥ ३ ॥

– श्री. सुधाकर जोशी (वय ९१ वर्षे, ६१ टक्के आध्यात्मिक पातळी), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.६.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक