‘खजान्या’च्या लालसेने स्वतःच्या ५ मुलांचा बळी देण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांध भावांना अटक

अशांंना सरकारने कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! अंनिससारख्या संघटना याविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

शिवसागर (आसाम) – येथे भूमीखाली दडलेल्या ‘खजान्या’च्या लालसेने दोघा भावांनी त्यांच्या ५ मुलांचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी जमील हुसेन, त्याचा भाऊ सरिफुल हुसेन आणि आयशा बेगम यांना अटक केली आहे.

१४ नोव्हेंबरच्या रात्री ते मुलांचा बळी देणार असल्याची माहिती स्थानिकांना मिळाल्यावर त्यांनी पोलिसांच्या साहाय्याने हा डाव उधळून लावला.