हिंदूंची धार्मिक स्थिती
मोगल आक्रमकांनी विद्यापिठे आणि धर्मग्रंथ जाळले, तर इंग्रजांनी इतिहासलेखनाच्या नावे इतिहास विकृत केला आणि स्वतःच्या धर्माचे कौतुक मांडले. त्यामुळे हिंदूंच्याच मनात स्वधर्माविषयी गैरसमजुती आणि अज्ञान आहे. हिंदूंमध्ये धर्माभिमान निर्माण होत नाही. धर्मशिक्षणाच्या अभावी धर्माचे खरे ज्ञान नाही. त्यामुळेच धर्मांतर, देवा-धर्माच्या विरोधात होणारी टीका, श्रद्धास्थानांचे विडंबन याविषयी काहीच वाटत नाही. तथाकथित पुरोगामी, निधर्मी, बुद्धीवादी, समाजसुधारक आणि धर्मद्रोही याचाच अपलाभ घेऊन हिंदु धर्माविषयी घृणा निर्माण होईल, अशी वक्तव्ये करून हिंदूंचा बुद्धीभेद करत आहेत.
हिंदु समाजाची स्थिती
मेकॉलेने गुरुकुल शिक्षणपद्धती बंद करून हिंदूंची संस्कृती संपवणे किंवा तिला विकृत करणे हे उद्दिष्ट ठेवले. यामुळे पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण आणि चंगळवाद पसरला. हिंदू दैनंदिन कृतींच्या स्तरावर, तसेच साम्यवाद, विज्ञानवाद, पुरोगामी, स्त्रीवादी, विज्ञानवादी या विचारसरणींच्या माध्यमांतून वैचारिक स्तरावर पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत आहेत. बलात्कार, खून, गुंडगिरी, आत्महत्या, दुष्काळ, भ्रष्टाचार यांमुळे माणूस हतबल झाला.
हिंदूंच्या राष्ट्राची स्थिती
सामर्थ्यहीन हिंदु समाज अन् राष्ट्र यांची दुःस्थिती झाली आहे. ख्रिस्ती आणि मुसलमान यांनी हिंदू आणि भारत यांना संपवण्याचा विडा उचलला आहे. धर्मांतर, दंगली, ‘लव्ह जिहाद’, आतंकवाद यांद्वारे हिंदूंचा वंशविच्छेद होत आहे.
हे सर्व पहाता हिंदूंना धर्म कळला पाहिजे. धर्मश्रद्धांवरील आक्रमणांचा प्रतिकार करून स्वतःचा वंश वाचवला पाहिजे, ही काळाची आवश्यकता आहे. धर्म टिकल्यासच आपण टिकणार आहोत. हिंदूंनो, धर्माचरण करणे हे आपले धर्मकर्तव्य आहे.
– एक धर्मप्रेमी