सध्या ‘कोरोना’मुळे भारतभरातील दळणवळण बंद असल्याने एप्रिल २०२० पासून कुंडलिनीचक्रांवर लावावयाच्या ‘निर्गुण’ या नामजपाच्या पट्ट्या वैयक्तिक स्तरावर बनवून घ्या !

साधकांना सूचना

१.४.२०२० ते ३०.६.२०२० या कालावधीत सहस्रार आणि विशुद्ध या चक्रांवर ‘निर्गुण’ या नामजपाच्या पट्ट्या लावायच्या आहेत. ‘कोरोना’ विषाणूंचा संसर्ग होऊ नये’, यासाठी सध्या देशभरातील दळणवळण बंद करण्यात आले असून पुढील काही दिवस ते बंद रहाणार आहे. त्यामुळे ‘निर्गुण’ या नामजपाच्या पट्ट्या सर्व जिल्ह्यांना पाठवता येणार नाहीत. ‘या काळात साधक आध्यात्मिक उपायांपासून वंचित राहू नयेत’, या दृष्टीने पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

१. ‘निर्गुण’ या नामजपाच्या जुन्या (अगोदर छापलेल्या); पण खराब नसलेल्या नामपट्ट्या उपलब्ध असल्यास त्या उपयोगात आणाव्यात.

२. घरी संगणकाचा ‘प्रिंटर’ उपलब्ध असल्यास त्यावरून ‘निर्गुण’ या नामजपाची प्रत काढू शकतो. याचे ‘आर्टवर्क’ नेहमीच्या संगणकीय पत्त्यावर उपलब्ध आहे.

३. नामपट्ट्या उपलब्ध नसल्यास ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेला किंवा भाव असलेला; पण आध्यात्मिक त्रास नसलेला साधक आपल्या आश्रमात किंवा घरी उपलब्ध असल्यास त्याच्या हस्ताक्षरात ‘निर्गुण’ हा नामजप कागदावर लिहून घ्यावा.

४. वरील तिन्ही पर्याय अवलंबणे शक्य नसल्यास भावपूर्ण प्रार्थना करून साधकांनी स्वतःच ‘निर्गुण’ हा नामजप कागदावर लिहावा.

नामजप लिहिलेला कागद प्लास्टिकच्या छोट्या पिशवीत घालून ती उपायपट्टी उपयोगात आणावी. ‘आपत्काळात दिलेले आध्यात्मिक उपाय करणे महत्त्वाचे आहे’, हे लक्षात घेऊन वरीलपैकी एखादा पर्याय निवडून उपायांची सिद्धता करावी.

साधकहो, आपत्काळात संजीवनी ठरणारे आध्यात्मिक उपाय गांभीर्याने करून गुरूंची कृपा संपादन करा !