अनुभूतींच्या माध्यमातून साधकांना आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले
१. परात्पर गुरु डॉ. आठवले दारातून आत येतांना ते पुष्कळ मोठे आणि व्यापक वाटणे : ‘एकदा आम्ही रामनाथी आश्रमात आलो होतो. तेव्हा आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांंचे दर्शन झाले. या वेळी परात्पर गुरु डॉक्टर दारातून आत येत होते. तेव्हा ते मला पुष्कळ मोठे आणि व्यापक वाटत होते. त्याच वेळी एक व्यक्ती तेथून बाहेर पडत होती. ती त्यांच्यापुढे सामान्य वाटत होती. ‘परात्पर गुरु डॉक्टर पुष्कळ उंच आहेत. नेहमीच्या दरवाजातून त्यांना आत कसे येता आले ?’, असे मला वाटले.
२. कधी कधी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील त्यांचे छायाचित्र बघतांनाही तसेच जाणवते आणि त्यांच्या व्यापक रूपाची जाणीव होऊन ईश्वरी अस्तित्व अनुभवायला मिळते.’
– सौ. रत्ना भंगाळे, मिरज, सांगली.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक